लहानपणी मित्रांबरोबर भांडणं व्हायची, मग अबोला धरायचो. दोघांनाही एकमेकांबरोबर बोलायचं असायच पण आधी कोण बोलणार यावर गाडी अडायची. ताण असह्य व्हायचा, मग पुन्हा बोलणं सुरू व्हायचं. त्या भांडणातही मजा असायची. भांडणाला काय, साधं कारणही पुरायचं. असं असलं तरी किती दिवस कट्टी करून रहायचो आम्ही.
परवा ऋचावर (माझ्या लुलीवर) रागावलो, थोड्या वोळाने मलाच वाईट वाटलं म्हणून तीला जवळ घेतलं, तीची समजूत काढली, तरी ती जरा गुश्शातच होती. मी ऑफिसला निघून गेलो. मनात हा विषय होताच. तासाभरातच ऋचाचा फोन आला म्हणाली “बाबा आपण तो विषय सोडून देऊया?” मी लगेच हो म्हणून टाकलं आणि मोकळा झालो. विनाकारण आलेला ताण तीने किती झटकन निवळून टाकला. अगदी रिलॅक्स वाटलं. आताची पिढी किती शहाणी झालीय नाही. भांडण - रागावणी – समजूत काढणं – कुणाची चुक म्हणून वाद घालणं – त्यावरून पुन्हा रागावणं – पुन्हा अबोला इत्यादी... इत्यादी असली भानगड नाही सरळ मुद्द्यावर येत सांगून टाकलं आपण तो विषय सोडून देऊया...!
तणावातून मोकळं होण्याचा किती छान उपाय!
Mastach.... Ase samajutdaar pane saglech vaagale tar kharech sagle khoop soppe houn jaail... :)
ReplyDelete