28 March, 2019

अंतराळातही सर्जिकल स्ट्राइक, पोखरण सारखंच मोठं यश!




'मिशन शक्ति' या उपक्रमाव्दारे भारताने अंतराळातही सर्जिकल स्ट्राइक केला आहे.  

पोखरण सारखीच गुप्तता पाळल्यागेलेल्या या  'मिशन शक्ति'ची फक्त ५-६ जणांनाचा कल्पना होती.

डीआरडीओचे माजी प्रमुख की व्ही. के. सारस्वत यानी म्हटलं आहे की संपुआप्रणित सकारने २००८ मध्ये या मोहिमेची आखणी केली होती. त्यानंतर वेगाने हालचाली करत २०१२ मध्ये तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला शक्तीमोहिमेसंबंधी सादरीकरण करण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने आम्हाला त्यावेळी संपुआ सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून आम्ही त्यावेळी पुढे जाऊ शकलो नाही. परंतु,  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कार्यालयाने सकारात्मकता दर्शविल्यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळेच आज २०१९ मध्ये भारताला हे यशोशिखर गाठता आले.

ए-सॅट क्षेपणास्र म्हणजे काय ?
एन्टी सॅटेलाईट हत्यारे (A-SAT weapon) ही मुख्यत्वे सुरक्षेच्या दृष्टीने उपग्रहांना नष्ट करण्यासाठी तयार केली जातात. हेरगिरी करणाऱया अंतराळातील उपग्रहांना हाणून पाडण्याची अशी उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र क्षमताआत्तापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे होती. आता भारतही याबाबतीत सक्षम झाला आहे.

डीआरडीओ च्या या प्रकल्पात गेल्या ६ महीन्यांपासून ३००  वैज्ञानिक आणि इतर दिवस-रात्र काम करीत होते.

'मिशन शक्ति' र प्रतिक्रिया देताना अमेरिकेच्या गृह खात्याने म्हटलं आहे की 'उपग्रह विरोधी मिसाइल परीक्षणासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलं आहे. भारत-अमेरिका यांचं हित आणि सुरक्षा या बाबतीत अमेरिका या पुढेही सहयोग देत राहिल.  

भारतीय वैज्ञानिकांनी मिशन शक्ती यशस्वी करून अंतराळातील लो अर्थ ऑरबिट उपग्रहाला ऍन्टी सॅटेलाईट क्षेपणास्त्राव्दारे नष्ट केल्याची अभिमानास्पद कामगिरी केली आहे. याबद्दल इस्रोचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. अत्यंत कमी कालावधीत पृथ्वी प्रदक्षिणा करण्याची गती असणारा उपग्रह टिपणारा अमेरिका, चीन आणि रशियानंतरचा भारत हा जगातील चौथा संपन्न देश बनला. ही घटना अभिमानास्पदच आहे. भारतावर गस्त घालणाऱया किंवा अंतराळातून भारताची हेरगिरी करणाऱया कोणत्याही परकीय उपग्रहाला उद्ध्वस्त करण्याची क्षमता भारत बाळगून आहे हे यातून सिद्ध झाले.
जगभरातून पंतप्रधानांच्या कणखर भूमिकेचे समर्थन आणि देश कसा कणखर हाती सुरक्षित आहे याचे गुणगाण गायिले गेले. काँग्रेसकडून अपेक्षितपणे ही वाटचाल पं. नेहरू यांच्या काळापासून कशी सुरू आहे याचा उल्लेख येऊ लागला. आज झालेली कामगिरी ही काही काल, आजची नाही. २००८ ते २०१२ या काळात हे काम सुरू झाले आणि २०२० साली ते पूर्ण होणार होते. शास्त्रज्ञांनी ते त्यापेक्षा कमी कालावधीत पूर्ण केले आहे. इस्रोने केलेल्या कामगिरीमुळे त्या त्या वेळच्या पंतप्रधानांची प्रतिमा उंचावलेलीच आहे. पं. नेहरूंनी या देशात अंतराळ संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली असे म्हणताना डॉ. विक्रम साराभाई यांचे नाव मागे पडतेच.

१९६२ साली देशात सुरू झालेल्या अंतराळ कार्यक्रमापासून ७५ साली देशाने रशियाच्या मदतीने सोडलेला पहिला उपग्रह आर्यभट्ट, ७६ सालचा उपग्रहाव्दारे शिक्षणाचे प्रयोग, ७९ साली दुसरा उपग्रह भास्करची स्थापना, १९८० चा पहिला भारतीय निर्मित आणि प्रक्षेपित उपग्रह रोहिणी हे यश आणि भारतीय प्रगती अमेरिकेच्या डोळय़ात खुपताना जगाने पाहिली आहे. आता मात्र अमेरिका सहकार्याची भाषा करीत आहे हे मोदी सरकारच्या परराष्ट्र नितीचं यश आहे. १९९२ साली अण्वस्त्र बंदी कार्यक्रमाच्या आडून रशियावर दबाव आणत भारताला एकटे पाडले. २०१४ सालापर्यंत भारताने या क्षेत्रात एकाकी वाटचाल केली. जीसॅट ३ ते १४ ही वाटचाल त्या काळातच झाली. जीएसएलव्ही डी ५  आणि प्रक्षेपणात स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करून १९९२ साली पूर्ण होणारे स्वप्न भविष्यात आपल्या देशाने स्वतःच्या ताकदीवर सत्यात उतरवले. मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी भारताने टेलिफोन, संगणक क्रांती केली होती. आता स्वतःबरोबरच जगातील २० देशांचे ५६ उपग्रह कमी किंमतीत आणि अचूक ठिकाणी स्थापित केले. अमेरिका, चीन आणि रशियाला मागे टाकले. आजही प्रक्षेपणासाठी परवडणारा देश म्हणून प्राधान्य दिले जाते हे भारताचे यश आहे.

पोखरणमध्ये केलेल्या अणूस्पोटासारखेच या घटनेला महत्व आहे.   

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates