29 January, 2019

पणजीचा केबल ब्रिज वाहतूकीसाठी खुला




पणजीचा केबल ५.१ किमी लांबीचा ब्रिज वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. पणजीची वाहतूक समस्या आणि गोवा-मुंबईमधल्या वाहतूकीचा वेग वाढवणार्‍या या पुलाची पायाभरणी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली केली होती.

केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री श्री. नितिन गडकरी यांनी रविवार गोव्याच्या मांडवी नदी वरच्या यापुलाचं उद्घाटन केलं. चार मार्गिक असलेल्या या पुलामुळे गोव्याची राजधानी पणजीचा वाहतूक भार कमी होऊन बंगळूरुहून मुंबईकडे जाणारी वाहनं या पुलावरून सरळ NH-17 वर जाऊ शकतील.

रोज साधारण ६६,००० वाहनांचा तासंतास होणारा खोळंबा यामुळे वाचणार आहे. एवढंच नाही तर राज्याच्या पर्यटनातही वाढ होणार आहे.

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे एक कारण आहे.




No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates