गेले दोन दिवस भिगवणला होतो. पुण्यापासून १०५ किलोमीटर आणि बारामती पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेलं भिगवण हे ठिकाण पक्षी निरीक्षणासाठी अगदी योग्य असं स्थान आहे. उजनी धरणाच्या जलाशयाचा फुगवटा बारामती जवळच्या भिगवण या गावा पर्यंत पसरला आहे. पानथळ जागेत वास्तव्यला असलेले रोहीत (Flamingo), अनेक प्रकारचे बगळे, बदके, पाणकोंबड्या, समुद्रपक्षी (Greater Flamingo, Stork, Moorhen, Seagulls, Geese), वेडा राघू एक ना अनेक पक्षी सर्वत्र वावरत होते. दोन वेळा रोहीत पक्षांची भरारी पहायला मिळाली. जलाशयाच्या मधूनच जाणारा रहदारीचा रस्ता असल्याने हे पक्षी माणसाच्या हालचालीना सरावलेले होते. त्यामुळे अगदी जवळून त्यांच दर्शन घेता येत होतं. सुखद थंडी आणि आल्हाददायक असा परिसर असल्याने पक्षीनिरिक्षणाचा आनंद घेत आला.
भिगवणला रहाण्याची हॉटेलची उत्तम व्यवस्था आहे.
Hey how to write in Marathi here?????
ReplyDeleteI am newcomer to Marathi blogs and today I read the first Marathi blog and it is yours Narendraji. I wish you should have the details of the hotel at Bhigwan.I liked the photographs.
नरेंद्र प्रभू,
ReplyDeleteआज पहिल्यांदाच तुमच्या ब्लॉगला भेट दिली. अत्रे कट्टा, कांदवली आणि निवडक नवयुग:अत्रे गौरवांजली या दोन्ही नोंदी वाचल्या.
या माहितीबद्दल धन्यवाद.
विशेष म्हणजे मी आताच अत्रे शैलीवर एक नोंद लिहली होती. ती पोस्ट केली आणि मराठी ब्लॉग.नेटवरुन तुमचा भिगवणचा लेख वाचायला इथे आलो तर अत्र्यांवरचे दोन लेखही दिसले.
मला इथे भेट द्या.
http://sansmarniya.blogspot.com/
नरेन्द्रजी, मला आपण बनविलेले फोटोचे कोलाज खूपच आवडले.मस्त झालेय. रोहीत पक्षांची भरारी... wow! बरीच वर्षे झालीत पाहून.
ReplyDeleteनिलीमा, सौरभ, भानस धन्यवाद. भिगवण खरच छान आहे एकदा तरी जा.
ReplyDeleteनरेंद्रजी, पक्ष्यांचे कोलाज खूपच छान! आज पहिल्यांदाच तुमच्या ब्लॉग ला भेट दिली. पोस्टिंग आवडले.
ReplyDeleteअरुंधती
--
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/
अरुंधती आपलं स्वागत. आपला ब्लॉगही आवडला.
ReplyDelete