मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणी बाग) येथे १५ व्या झाडे, फुले, फळे व भाज्या यांचे प्रदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान झाडांची विक्री होणार असून व्यावसायिक दुकानांचाही त्यात समावेश आहे. या प्रदर्शनात सूर्यप्रकाशात कुंडय़ांमधील वाढणारी बहुवार्षिक फुलझाडे आणि झाडांची एकत्रित मांडणी, कुंडय़ांमध्ये वाढलेली फळे, कुंडय़ा किंवा परडय़ांमध्ये वाढलेली मोसमी फुलझाडे, कुंडय़ांमधील विविध प्रकारची झाडे, बागेतील वाढलेले विविध गुलाब, निवडुंग, बांडगुळ, वेली, झुलत्या परडीतील झाडे, कुंडय़ांमधील फुलांची झाडे, बागेतील निसर्गरचना, कलात्मक पुष्परचना, आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाचे वृक्ष यांचा समावेश आहे.
मुंबईत चिमण्यांची संख्या खुपच कमी झाली आहे. अगोदर सहजच दिसणार्या या चिमण्या आता पाहायला मिळत नाहीत. ‘स्पॅरो शेल्टर’ चे प्रमोद माने यांनी चिमण्यांसाठी आकर्षक घरं बनवली असून (पहा:http://www.sparrowshelter.org) ते ती घरं आपल्या जागे प्रमाणे बनवून आणि घरी आणून लावूनही देतात. दरवर्षी भरणारा झाडे, फुले, फळे यांचा मेळा बघण्यासारखा असतो.
No comments:
Post a Comment