08 February, 2010

नेत्रहीनांनमागचा डोळा

काल श्रीपाद आगाशे यांची भेट झाली. एक माणूस एखाद्या कार्याला वाहून घेतल्यावर किती काम उभं करू शकतो याचं श्री. आगाशे हे एक उत्तम उदाहरण आहेत. १९८० साली त्यानी रिडर्स डायजेस्टमध्ये माहिती वाचली की श्रीलंकेसारखा इवलासा देश भारतासहीत इतर चाळीस देशांना नेत्र पुरवठा करतो. भारतासाठी तर ही गोष्ट नामुश्कीची होती. आगाशे भाभा अणूशक्ती केंद्राच्या कल्पाक्कम प्रकल्पावर काम करत होते. तामिळनाडूत असूनही त्यानी एकट्याने नेत्रदान प्रसाराच्या कार्याला सुरवात केली. नेत्रदानाच्या कामाला स्वतःला वाहून घेतले. पुढे मुंबईत आल्यावर तर त्यांच्या कामाला अधिकच वेग आला. २४ वर्षांच्या या अथक प्रयत्नात त्यांच्या संपूर्ण कुटूंबीयांचा सहभाग आणि मोलाचं सहकार्य असतं.

दिड कोटी नेत्रहीनांनपैकी तीस लाखावर लोकांना नेत्रदानामुळे हे जग पाहता येवू शकेल असही श्री. आगाशे म्हणतात. नेत्रदान प्रसारासाठी त्यांनी प्रकाशाची पहाट हा कवितासंग्रह आणि डोळस दान ही एकांकीका अशी दोन पुस्तकं प्रकाशीत केली आहेत.

  • मराठी, हिंदी किंवा इंग्रजीमधून व्याख्यान देणे.
  • विविध सार्वजनिक ठिकाणी प्रचाराचे स्टॉल्स टाकणे.
  • दुरध्वनीवरून माहिती देणे.
  • माहितीपत्रके, फॉर्मस् पोस्टाने पठवणे.

असं प्रचाराचं काम आगाशे करत आहेत.

आपण ठरवूया आपल्यारी

नेत्र नाही जाळायाचे, पुरायाचे

चिकाटीची वृत्ती ठेवू निर्धारी

ते नेत्रपेढीला दान करायचे

असा संदेश देणार्‍या आगाशेंच्या पवित्र कार्यात मदत, सहभाग घ्यायचा असेल तर आपण खालील पत्यावर संपर्क साधू शकता.

श्रीपाद वि. आगाशे सी. ५४

रश्मी संकुल, मनोरुग्ण मार्ग,

ठाणे (पश्चिम) ४००६०४.

मो. ९९६९१६६६०७

6 comments:

  1. नेत्रदानाच्या कार्यात श्रीपाद आगाशे यांच्या चळवळीने खूप मोलाचा हातभार लागतो आहे. अशा थोर व्यक्तीमत्त्वाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  2. छानच माहिती दिलीत...असेही काही सेवाव्रती पाहिले की जिवनाच्या सकारात्मक बाजूची पुन्हा ओळख होते आणि नुसतेच त्यांचे कौतूक न करता आपणही काहितरी योगदान करावे असे वाटते.....

    ReplyDelete
  3. कांचन, तन्वी नमस्कार, श्रीपाद आगाशेंची आणि माझी भेट ब्लॉगमूळेच झाली. व्रतस्थ असं व्यक्तिमत्व आहे. आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  4. 'Agashe"na bhetayala ani tyanchya karyatun prerana ghyayala avadel.

    Rjesh Gade

    ReplyDelete
  5. श्री.नरेंद्र प्रभू ,
    आपली भेट झाल्यावर लगेचच आपण माझ्या नेत्रदानाच्या कार्याबद्दल लिहिलेले पाहून आपल्या चिकाटीचे कौतुक वाटले. ३ प्रतिक्रियाही आलेल्या पाहून आनंद वाटला.श्री.गाडे याना भेटायला मलाही आवडेल.माझा पत्ता सी-५४,रश्मी संकुल, मनोरुग्णालय मार्ग ,ठाणे (पश्चिम)४०० ६०४ असा आहे. दूरध्वनी क्र. निवास- ०२२-२५८०५८०० ,कार्यालय-०२२-२५५९४०४९,भ्रमण ध्वनी -०९९६९१६६६०७. श्री लंकेवरील आपले अत्यंत लाजिरवाणे परावलंबन नष्ट करण्यासाठी अधिकाधिक व्यक्तींनी पुढे येणे अत्यावश्यक आहे.इ मेलवरून मराठी आणि इंग्लिशमधील सविस्तर माहितीपत्रकांसाठी संपर्क-shreepad.agashe@gmail.com

    श्री.वी.आगाशे

    ReplyDelete
  6. सप्रेम नमस्कार,
    आता मी 'www.netradaan.blogspot.com' हा ब्लॉग सुरु केला असून त्यातून बरीच माहिती मिळू शकेल.ज्यांना इ मेल द्वारे नेत्रदानावर माहितीपत्रके हवी असतील त्यांनी कृपया मला shreepad.agashe@gmail.com वर मेल केल्यास मी ती जरूर पाठवीन. ही आपण पुढे परिचित,अपरीचीतांनाही forward करीत जावे ही कळकळीची विंनंती. यातून मोठाच प्रचार होऊन पुढेमागे काही दृष्टीहीनांना अमूल्य दृष्टी मिळेल असा सार्थ विश्वास वाटतो.
    -श्री.वि. आगाशे,ठाणे

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates