भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी ९५ वर्षांपूर्वी सर्वप्रथम पडद्यावर साकारलेल्या ‘राजा हरिश्चंद्र ’ या चित्रपटाची निर्मितीकथा सांगणारा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा एक सर्वांगसुंदर चित्रपट आहे. सर्व मरठी चित्रपट प्रेमींनी आवर्जून पहावा असा हा चित्रपट कालच आम्ही सहकुटूंब पाहिला.
१९११ मध्ये मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा चलतचित्र पाहण्याचा अनुभव दादासाहेब फाळके यांनी घेतला आणि ते अक्षरशः हरखून गेले. फोटोग्राफीचा छंद त्यांना होताच आणि जादुचे प्रयोगही ते करत होते. त्यामुळे ही जादूसुद्धा भारतात यायला हवी, अशी जिद्द उराशी बाळगून फाळके कामाला लागले. चलतचित्राच्या निर्मितीप्रक्रियेच्या शोधमोहिमेनं त्यांना झपाटून टाकलं होतं. खिसा रिकामा झाला होता, तेव्हा या ध्येयवेड्या माणसानं आपलं घरदार विकायलाही मागेपुढे पाहिलं नाही.
अखेर, दादासाहेबांना या अथक मेहनतीचं फळ मिळालं आणि ३ मे १९१३ या दिवशी‘ राजा हरिश्चंद्र ’ पडद्यावर झळकला. ही सगळी कथा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न परेश मोकाशी यांनी ‘ हरिश्चंद्राची फॅक्टरी ’ या आपल्या ९० मिनिटांच्या सिनेमामध्ये केला आहे.
Awards and honours
- 2009: Pune International Film Festival: Best Director Award: Paresh Mokashi
- 2009: 18th Aravindan Puraskaram 2009 (Chalachitra Film Society, Pune): Best Debutant Director: Paresh Mokashi [9][10]
- 2009: India's Official entry: Academy Award for Best Foreign Language Film
- 2009: 46th Maharashtra State Film Awards
- Best Film
- Best Director: Paresh Mokashi
- Best Art Direction: Nitin Chandrakant Desai
- 2009: Ahmedabad International Film Festival: Best Film
- 2009: Kolhapur International film Festival: Best Film [People's Choice Award]
- 2009: Signs 2009, Kerala : Best Film
- 2009: Chalchitra Film society, Kerala : Best Débutante director
- 2009: Golapudi Shrinivas National Award, Chennai : Best Débutante director
- 2009: V Shantaram Award : Best Costume : Mridul Patwardhan, Mahesh Sherla, Geeta Godbole
- 2009: Balasaheb Sarpotdar Award : Best Film
खुपंच सुंदर चित्रपट आहे हा... जरुर पहावा असा....
ReplyDeleteखरच सर्वांनी सहकुटूंब पहावा असा चित्रपट आहे.
ReplyDelete