01 May, 2022

अहा...! बहावा असा बहरला!

  

P.C. Dr. Anjali Joshi

डॉ. अंजली जोशी यांच्या बागेलील बहाव्याचा पहिला बहर पाहून सुचलेली कविता.  

 

सोनेरी हे झुंबर झेलेअहा...! बहावा असा बहरला!

पुलकित झाले माझेही मन, आनंदच जणू असा पसरला!

 

हिरव्या शालीमधून विलसे तनू सोन्याची आरसपानी

रूप यौवना जणू उभी ही मोद विहरते गाते गाणी

 

हळूच वारा झोका देतो डौलाने बघ बसे पाखरू

एक पाकळी सुटून आली? की हा हळवा आनंदाश्रू?

 

नवं यौवनच हे सृष्टीचे चैत्राने बघ बहाल केले

की लक्ष्मीच्या वर्षावाचे स्वर्गातून हे देणे आले?

 

नरेंद्र प्रभू

०१/०५/२०२२





1 comment:

  1. Anjali Joshi
    माझ्या बहाव्याला ही कविता अर्पण...सदैव स्मरणात राहील 🙏🙏 खूप खूप धन्यवाद...८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हा सुंदर आविष्कार बघायला मिळाला...आणि तुमच्या कवितेने त्यावर स्तुतीसुमने उधळली🙏🙏🙏Anjali Joshi

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates