चित्र:
सौ. रेखा भिवंडीकर |
काल memoir हे चित्रप्रदर्शन पाहिल्यानंतर मन अजूनही तिथेच रेंगाळत राहिलंय. त्या चित्रांनी असा फेर धरलाय की दुसरं काही सुचत नव्हत. ही कविता स्फुरली आणि मगच बरं वाटलं.
ती आई होती म्हणूनी घनव्याकुळ मी ही झालो
किती
वेळ आतल्या आत दुलाईला कवळून बसलो
तो
स्पर्श मुलायम होता; जरी हात राबले होते
कष्टाने
ओढीत होती ते शुभ्र पिठाचे जाते
बागेला
फुलण्याचेही ती स्वप्न दाखवीत होती
फुलताना
मजलाही 'ती' 'ही' फुले देऊनी गेली
किती
काळ लोटला आहे ती पुन्हा समोरी आली
मायेच्या
ओलाव्याने मज चिंब भिजवूनी गेली
ती
आई होती म्हणूनी...
नरेंद्र
प्रभू
No comments:
Post a Comment