गोठलेल्या लडाखसफरीवर आत्माराम परब |
निसर्गाच्या करामती त्याचे विभ्रम आणि एकुणच निसर्ग आपल्या सर्वानाच आवडतो पण तो कितपर्यंत तर तो आपल्याला अनुकूल असतो तोपर्यंत. त्याने जरा डोळे वटारले तर आपली पळता भुई थोडी होते. सद्ध्या पडत असलेल्या अवकाळी पावसाने उभ्या माहाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. या वर्षीचा पावसाळा देशवासीयांना जास्तसा छळणाराच आहे. सुरवात झाली ती लेह-लडाखच्या ढगफुटीपासून. लडाख प्रांतात ढगफुटी झाली आणि काही मिनिटातच होत्याचं नव्हतं झालं. लडाखवर, तिथल्या निसर्गावर प्रेम करणार्या महाराष्ट्रातल्या हजारो पर्यटन प्रेमींना तर धक्काच बसला. लडाखपासून हजारो मैल दूर असूनही गेली पंधरावर्ष सातत्याने लडाखवारी करणारे माझे मित्र आत्माराम परब यांच्या ते जिव्हारी लागलं. इतर पर्यटक लडाखमधून आपली सुटका करून घेत असताना आत्मारामचा मात्र उलटा प्रवास सुरू होता. मिळेल ती मदत घेऊन त्यानी लडाख गाठलं. सर्वस्व गमावलेल्या लडाखी मित्रांना तिथे जाऊन मदत केली, धिर दिला. त्या ढगफुटीमुळे लडाखच्या पर्यटन व्यवसायावर तर आभाळच कोसळलं. सगळ्या सहली ठप्पा झाल्या. असं असलं तरी खचून न जाता आत्माराम परब यांच्या ‘इशा टुर्स’ने लगेचच आपली टुर लडाखला नेली आणि पर्यटनाचा ओघ चालू ठेवला पाहिजे असा धडा आपल्या कृतीतून घालून दिला.
लडाखचा पर्यटनाचा हंगाम अचानक थांबला आणि तिथला हिवाळा सुरू झाला. ढगफुटीमुळे लडाखची जी हानी झाली, तिथल्या जनतेचा रोजगार बुडाला त्याला काहीना काही हातभार लावावा हे सतत मनात असल्याने ‘इशा टुर्स’च्या माध्यमातून या वर्षी गोठलेल्या लडाखला सहली नेण्याचा आत्मारामचा मानस आहे. गेली काही वर्ष हिवाळ्यात लडाखला जाऊन ‘व्हिंटर लडाख’ची अनुभूती आत्मारामनी घेतली आहे. त्या भ्रमंती दरम्यान काढलेली चद्दर ट्रेक, फ्रोजन लडाखची छायाचित्र आणि आपले अनुभव घेऊन आत्माराम आपल्याला भेटणार आहे आजपासून पुढचे चार दिवस.
‘गोठलेलं लडाख’ छायाचित्र प्रदर्शन
दिनांक २५ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर, २०१०,
सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत
(सर्वांसाठी विनामुल्य प्रवेश)
स्थळ: पु.ल. देशपांडे कला दालन, रविंद्र नाटयमंदिर आवार, प्रभादेवी, मुंबई २५.
Dear Shri Atmaram Parab & Narendra Prabhu,
ReplyDeleteNamaskar.......
Greetings from Santosh D Patil,Mumbai.
Many thanks for your Invitation.
I wish you great success for to-days function.
With best regards,
SANTOSH.D.PATIL
मी आज येणार होतो पण नाही जमले. आपल्याला भेटण्याची फार तीव्र इच्छा झाली होती, आता पुढचे तीन दिवस मी मुंबईमधे नाही. मला या प्रदर्शनाला यायचे होते.
ReplyDelete‘गोठलेलं लडाख’ छायाचित्र प्रदर्शन खुपच आवडलं. रक्त गोठवणा-या थंडीत कँमेराची 'कळ' दाबनं इतक सोप नसत मग फोकसिंग करनं ही दुरची गोष्ट, पण 'अत्मा'ने ते सहज करुन दाखवलं आहे. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.
ReplyDeleteहरेक्रिष्णजी, नमस्कार. एखादा चांगला कार्यक्रम असला की आपली आठवण आवर्जून येतेच. तुमची भटकंती सुरू आहे हे मी रोजच्या पोष्टवर लक्ष ठेऊन असल्याने माहित आहे. मध्यंतरी आकाशवाणीच्या सभागृहात कवी बा.भ. बोरकरांवरचा एक अप्रतीम कार्यक्रम झाला, माझच नक्की होत नव्हतं म्हणून आपल्याला विचारलं नाही. असो लवकरच भेटू.
ReplyDeleteविजयजी, वेळात वेळ काढून आलात त्या बद्दल धन्यवाद. कॅमेर्याची कळ दाबण्या आधी किती 'कळ' सोसावी लागते हे आपल्या सारख्या छायाचित्रकाराने सांगितलं ते अधिक बरं झालं, किती जण अनावधानाने फोटो चांगला आलाय असं म्हणतात, आपण तो चांगला काढलाय म्हटलं यातच सगळं आलं. आपल्या भावना 'आत्मा' पर्यंत पोहोचवतो.
ReplyDelete