हल्ली वर्गात कविता एका सूरात म्हटल्या जाताहेत असं क्वचितचऎकायला येतं. मराठी माध्यमाच्या शाळाही त्याला अपवाद नाहीत, इंग्रजीची तर बातच सोडा. कवितेला चाल लाऊन ती वर्गात एका तालात म्हटल्याने ती पुन्हा पाठ करावी तर लागत नाहीच पण ती लक्षातही चांगली राहते. अर्थ उमगत जातो. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून ही गोष्ट होणं कठीण याच स्वानुभवातून सौ. कल्पना प्रभु यांनी इंग्रजी माध्यम, मराठी कविता हीऑडीओ सिडी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केली आहे. सौ. कल्पना प्रभु या नुकत्याच गोरेगाव, मुंबई येथील कॉनव्हेंट स्कूल मधून सेवा निवृत्त झाल्या असून दहाविच्या अभ्यासक्रमातला मराठी कवितांचा बोजा कमी व्हावा, त्यामध्ये ग्येयता यावी म्हणून लगेचच त्यानी हा उपक्रम हाती घेऊन तडीस नेला आहे. हे करत असताना स्वतःच्या पदराला खार लावून त्यांनी निवृत्त झाल्यावरही आपला विद्यार्थ्याप्रती असलेला प्रेम, जिव्हाळा व्यक्त केला आहे.
१ गुरू हा संतकुळीचा राजा
२ भक्ताचिया लोभा
३ वैकुंठीचा हरि
४ काय करू आता
५ खेळणी
६ निरोप
७ तहान
८ संघर्ष
९ अंधार पखाली
१० कसं चालेल
११ शब्दशस्त्र
१२ श्वास
वरील इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता दहावीच्या मराठी पुस्तकातील सर्व कविता सदर सिडीमध्ये आहेत. प्रत्येक कवितेच्याआधी असलेलं अर्थपुर्ण निवेदन आणि संगीताचा बाज या मुळे या कविता श्रवणीय तर झाल्या आहेतच, पण सहज ऎकता ऎकता विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करणार्याही आहेत. संगीतकार संजय गायकवाड यांनी या कवितांना सुंदर चाली लावल्या आहेत तसच काही कविताना आपला आवाजही दिला आहे. कु. ऎश्वर्या चव्हाण, कु. वरूण बिड्ये यांच्या बरोबरच स्वतः सौ. कल्पना प्रभु यांनी गायनाची बाजूही सांभाळली आहे. याबद्दल अधिक माहीतीसाठी: सौ. कल्पना प्रभु (9969104365) किंवा श्री. संजय गायकवाड (9867444076) यांच्याशी संपर्क साधावा आणि दहावीचे विद्यार्थी तसेच शाळांनी याचा जरूर लाभ उठवावा.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
चांगला उपक्रम आहे. मुलांना नक्कीच फायदा होईल.
ReplyDeleteमहेंद्रजी, शिक्षकांनी नव्या युगाला सामोरं जाऊन असे नवनवे उपक्रम राबवले पाहिजेत. आधुनीक तंत्रज्ञान आत्मसात करून ते उपयोगात आणलं पाहिजे.
ReplyDeletekalpan kharc chan aahe shikananhi fayada hohil
ReplyDelete