कोणतेही कारण शोढून काढून मोठ्या पदावर असणार्या व्यक्तींबरोबर आपली छबी झळकवायचा सोपा मार्ग म्हणजे ‘होर्डिग्ज’. ‘शुभेच्छुक’ म्हणून स्वतःबरोबर इतर बगलबच्चांची पंगत त्या फ्लेक्सवर कशी चमकेल याचाच ध्यास या महाशयांनी घेतलेला असतो. ‘फ्लेक्स’चं आगमन झाल्या पासून शहरं तसच गावांचं विद्रुपीकरण झपाट्याने होत आहे, पर्यावरणाची हानी होत आहे. खरं म्हणजे स्थानीक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतल्या शिवाय असे फलक लावता येत नाहीत पण तिकडे लक्ष कोण देतो. भ्रष्टाचाराच्या इतर बाबींमध्ये आकंठ बुडालेल्या पदाधिकारी आणि कर्मचार्यांना या ‘छोट्या-मोठ्या’ गोष्टीमध्ये लक्ष द्यायला वेळच नसतो. महाघोटाळ्यात तोंड काळं झाल्यावर एक मुख्यमंत्री गेला आणि त्याच्या जाग्यावर दुसरी व्यक्ती आली, उभ्या महाराष्ट्राची मान खाली गेली. या वेळीसुद्धा या चमकेश बहाद्दरांनी संधी साधली आणि आपली हौस भागवून घेतली. पण या वेळी नव्या मुख्यमंत्र्यानी ती होर्डिग्ज हटवा असा आदेश दिला आणि आपण खुशमस्कार्यांची फौज बाळगणार नाही असाच जणू संदेश दिला. ते काहीही असो पर्यावरणाला घातक अशी ही होर्डिग्ज उभारली जाऊ नयेत असा संदेश नवे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला हे ही नसे थोडके. खरं म्हणजे असे अनधिकृत बॅनर लावणार्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. पण करणार कोण?
Masai Mara National Reserve
-
Masai Mara National Reserve is a large game reserve in Narok County, Kenya,
contiguous with the Serengeti National Park in Mara Region, Tanzania.
Ma...
5 years ago
प्रभु,
ReplyDeleteतुम्ही लाखो मुंबईकरांच्या मनातलं लिहलं त्या बद्दल धन्यवाद! नवे मुख्यमंत्री वाटतात तरी चांगले? पण गढूळ पाण्याच्या डबक्याला नवीन रखवालदार मिळाला म्हणजे पाणी स्वच्छ होणार नाही! बघुया ते कुठला "आदर्श" आपल्या पुढे ठेवतात ते!
नितीन पोतदार.
नितीनजी, आपण सगळ्याच आशा गमावून चालणार नाही. पण सध्यातरी पहाट होण्याची वाट पहाणच आपल्या हाती आहे.
ReplyDelete