skip to main |
skip to sidebar
ओबामा मुंबईत येऊन गेले. त्यानी सर्वच मुंबईकरांची मनं जिंकली. जगातील एकमेव महासत्ता असलेल्या देशाचा प्रमुख असूनही कसलीच प्रौढी त्यानी मिरवली नाही. ज्यांना ओबामांची प्रत्यक्ष भेट लाभली ते खरच सुदैवी म्हटले पाहिजेत. मणीभवनची ओबामांची भेट गाजली. पण त्या आधी त्याच मणीभवन मध्ये एक नाट्य रंगलं होतं. मणीभवन मध्ये ओबामा येणार म्हणून अमेरिकन अधिकारी तिकडे गेले. ओबामा आल्यावर कोणी कुठे किती अंशाच्या कोनात वाकून उभं रहायचं, काय करायचं, काय बोलायचं याच्या सुचना दिल्या जात होत्या. एक गांधीवादी मात्र म्हणाला हे जमणार नाही. अधिकारी चक्रावले. का? असं आवासून त्यानी विचारलं तेव्हा “मला माझ्या पुर्व नियोजीत कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला येता येईल असं वाटत नाही” असं तो गांधीवादी म्हणाला. अधिक चौकशी केल्यावर समजलं की त्या जेष्ठ गांचीवाद्याने कोकणकन्या एक्सप्रेसचं तिकिट काढलं होतं आणि भेटीच्या आदल्या रात्री त्यांना कोकणकन्याने रत्नागीरीला जायचं होतं. प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी आपला पुर्वनियोजीत कार्यक्रम न बदलणारा हा गांधीवादी पुलंच्या अंतु बर्व्याच्याच गावचा. मान लिया उस्ताद. वाचा: महत्त्वाचं काय? ओबामांची भेट की मोठय़ा मुश्किलीने मिळालेले कोकणकन्या एक्स्प्रेसचे तिकीट?
No comments:
Post a Comment