वाटा
असती कधी न सोप्या
अवचित
कधी ती वाट अडे
कडेकपारी
सह्याद्रीच्या
घालून
देती हेच धडे
पायवाटा
माझ्या झाल्या म्हणत त्या वाटांचंच हमरस्त्यात रुपांतर करीत नसते अवघड काही
रे म्हणणार्याचीही आज वाटांवरती
काटे रे अशी अवस्था झाली आणि न सुटणारं
हे कोडं कसं सोडवायचं अशी स्थिती आहे.
खरंच आज वाटा अडल्या आहेत आणि सगळं जगच बंदीवान
झालं आहे. पायाला चाकं असलेल्याची तर पार कुचंबणा झाली आहे. पण हेही दिवस जातील
आणि पुन्हा एकदा आपण सगळे नव्याने बाहेर पडूच....! आज ही खात्री वाटण्याचं कारण ठरला
प्रिय मित्र आत्माराम परब.
फेसबुक वॉच पार्टीवर चांगला पाऊण तास या पठ्ठ्याने
गप्पांची मैफिल रंगवली. मी पुढे जाणारच या दुर्मम्य इच्छाशक्ती पुढे कोरोना हरेलच
पण पुन्हा नव्याने जगभराची भ्रमंती सुरू होईल.
आत्मा बोलत असताना गेला दिड महिना दाटून आलेलं मळभ कुठल्याकुठे नाहीसं झालं
आणि नव्या वाटा पुन्हा साद घालू लागल्या. त्याचं बोलणं सुरू असताना येणार्या प्रश्नांवरून हे लक्षात येत होतं. मित्रहो मन प्रसन्न
करणारे खुप छान क्षण होते ते. आपणही याचा आनंद या लिंकवर जाऊन लुटाच:
No comments:
Post a Comment