ईशान्य वार्ताचे संपादक पुरुषोत्तम रानडे, प्रकाशक जयवंत कोंडवीलकर, संघटक विवेक
गानू, समंवयक
संजय काठे आणि जनकल्याण समितीचे वसंत देशपांडे यांच्या सततच्या प्रयत्नामुळे हे
मासिक पुन्हा नव्या जोमाने सुरू झालं आहे. पुर्वांचलाशी महाराष्ट्राची नाळ कृतीशील
प्रयत्नाने जोडण्यासाठी गेली अनेक वर्ष ही मंडळी सात्यत्याने प्रयत्नात असतात आणि
अनेक सामाजिक सांकृतीक प्रकल्पांव्दारे त्या कार्यात भर घालत असतात. ईशान्य वार्ता
हे मासिक सुरू झालं आणि त्यांचा हा प्रयत्न आणि त्याची माहिती अनेक व्यक्ती आणि संस्थांकडे
पोहोचू लागली. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, त्रिपूरा, नागालँड आणि
मोझोराम या पुर्वेकडच्या सात राज्यांकडे तसं कुणाचंच लक्ष नसतं, देशाच्या सिमांत
भागात असलेली ही राज्य संरक्षण दृष्ट्याही अत्यंत महत्वाची अशी आहेत. देशाचा
पंतप्रधान जरी आसम मधून निवडून येत असला तरी तिकडे लक्ष द्यायला गेल्या दहावर्षात
त्यांना वेळ मिळाला नाही.
हे मासिक सुरू झाल्यानंतर गेलं जवळ-जवळ वर्षभर बंद होतं. दिवसेंदिवस वाढत
जाणाराखर्च आणि काम यांचा मेळ घालण्याची तयारी करून हे मासिक पुन्हा सुरू होत आहे.
देशप्रेमाच्या केवळ पोकळ गप्पा न मारता आपल्या कृतीने ‘सारे भारतीय माझे बांधव
आहेत’ हे वाक्य प्रत्यक्षात आणणार्या या मंडळींना आणि ईशान्य वार्ताला
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हार्दीक शुभेच्छा.
वर्गणी आणि लेखन साहित्य पाठवण्यासाठी कृपया खाली दिलेल्या पत्यावर संपर्क साधावा.
पुरुषोत्तम
रानडे
कृष्ण
कुटीर, आयरे मार्ग,
डोबिवली
पुर्व 421201
भ्रमण ध्वनी:
9404762972
No comments:
Post a Comment