या उजाड माळावरती
मी उन्हात फिरतो आहे
ती फुले काल रात्रीची
मी अजून शोधतो आहे
अवचीत अशी हसलीस
ना कळले मजला काही
की मला तशी दिसलीस
तो गंध फुलांचा होता
की तुझाच होता सांग
पसरला सभोवती होता
नव प्रेमाचा मृदगंध
तारका नभी फुलताना
तू कळ्या मांडल्या होत्या
अन गालावर कुसूमाच्या
निश्वास टाकला होता
तो चंद्र साक्षीला होता
की तुझाच तो फितूर
सामोरा मी तुज आलो
तू गेलीस किती, किती दूर
नरेंद्र प्रभू
तारका नभी फुलताना
ReplyDeleteतू कळ्या मांडल्या होत्या
अन गालावर कुसूमाच्या
निश्वास टाकला होता
Khupach chan !
धन्यवाद.
ReplyDeleteChan kavita aahe
ReplyDelete