|
हितेंद्र सिनकर |
मोबाईलमध्ये कॅमेरा उपलब्ध झाला, तसंच सोशल मिडीयाचा सुळसुळाट झाल्यापासून
सगळीकडे फोटोंची लयलुट झालेली दिसते. आता त्यात पहावे असे किती फोटो असतात हा खरा
प्रश्न आहे किंवा ज्याच्या त्याच्या अभिरुचीचा तो भाग आहे. पण तुम्हाला खरंच देखणी
छायाचित्रं पहायची असतील तर:
जहांगीर आर्ट टेरेस गॅलरी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४०० ००१
येथे हितेंद्र सिनकर यांनी छायाचित्र प्रदर्शन मांडलं आहे. हे प्रदर्शन दि. १६ ते २२ जानेवारी
२०१४ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या
वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.
हितेंद्र सिनकर या उपजत छायाचित्रकाराने हे प्रदर्शन मांडलं आहे. सिनकरांनी
काढलेले फोटो पाहाणं हा एक सोहळा असतो. नेत्रसुखद म्हणजे काय असतं ते त्यांची
छायाचित्रं पाहिल्यावर समजतं. गेली तीस
वर्षं फोटोग्राफी तंत्रात झालेले बदल, माध्यमं आणि कॅमेरे याचं पुरेपूर ज्ञान
सिनकराना आहेच पण फक्त तांत्रिक बाबीत न अडकता दृष्याचा आत्मा रसिकांपर्यंत
पोहोचवण्याचं काम त्यांची छायाचित्रं करतात. डिजीटल फोटो; स्क्रिन आणि प्रिंट मिडीयावर वेगवेगळे दिसतात. फोटो
काढल्यावर छपाईपुर्व संस्कार म्हणजे काय आणि ते कसे केले पाहिजेत याचं उत्तम
उदाहरण म्हणजे सिनकरांचे हे फोटो आहेत.
लेह-लडाखचं अनोखं सौदर्य, त्सो मोरीरी, पॅगॉंग हे तिथले तलाव, गोठलेलं लडाख, कैलास
मानसरोवरची पवित्र भूमी, आकाशातल्या ढगांचे विभ्रम, समुद्राच्या लाटांचा जिवंतपणा,
ब्रम्हपुत्रेची पुळण, तिबेटच्या गुंफा, मध्यप्रदेशचं शुष्क जंगल, कृष्ण-धवल
रंगातील छाया प्रकाशाचा खेळ, इंद्रधनुष्याचे सप्तरंग, विद्युल्लतेचा लोळ, गुढ आकाश,
सोनपिवळी उन्हं, पिठूर चांदण्यातला कैलास पर्वत,
विमानातून टिपलेलं एव्हरेस्ट शिखर, पाण्याच्या
विविध रंगछटा, एवढंच नाही तर पाण्यात नुकतच पडलेलं एक पान अशी अनेक छायाचित्रं
पाहून आपण चित्रमुग्ध होतो. छयाचित्रण कलेचा आत्मा गवसलेल्या या कलाकाराची
छायाचित्रं पाहून त्या त्या ठिकाणाला भेट देण्याचा किंवा आपण आधीच भेट दिली असेल
तर पुन:प्रत्ययाचा आनंद आपल्याला ही छायाचित्रं पाहून खचितच होईल. जिज्ञासूंनी सिनकरांच्या http://www.hitendrasinkar.com/gallery/ या संकेतस्थळालाही जरूर भेट द्यावी
ho, mi pahilet tyanche photo, khupach surekh chayachitran
ReplyDeleteAniket
great !!!
ReplyDeletemajeshir.blogspot.in/?m=1
great !!!
ReplyDeletemajeshir.blogspot.in/?m=1