- यात्रेचं पावित्र्य जपावे.
- यात्रेला निघण्यापूर्वी पहाटे लवकर उठून सूर्याला नमस्कार करून स्मरण करावे.
सूर्यनमस्कार घालून चार ते पाच फर्लाग हळू गतीने धावण्याची सवय करावी.
- प्रवासाला निघताना कुठल्याही तिबेटीयन लामाचे फोटो, पुस्तक, नकाशा घेऊन जाऊ नका.
- सदैव बॅटरी, औषधे, पासपोर्ट इत्यादी
गोष्टी जवळ सांभाळून ठेवा. जास्तीत जास्त गरम कपडे घेऊन जा.
- पाऊस व बर्फवृष्टीपासून संरक्षणार्थ सदैव रेनकोट जवळ ठेवा.
- रक्तदाब, हृदयविकार, बायपास सर्जरी, दमा, मधुमेह किंवा श्वासाचा
विकार असल्यास किंवा वयोवृद्ध व लहान मुलांनी ही यात्रा करताना कळजी घ्यावी.
- आपत्कालीन अपघात विमा उतरवावा.
- काठमांडू विमानतळावर उतरल्याबरोबर एमिग्रेशनचा शिक्का आपल्या पासपोर्टवर न
विसरता मारून घ्यावा व मगच विमानतळाबाहेर यावे. तिबेटमध्ये अशा शिक्क्याची गरज
असते.
- यात्रे दरम्यान कॅमेऱ्याचे व बॅटरीचे सेल आपल्या खिशात गरम कपडय़ांमध्ये
गुंडाळून ठेवा. गरज भासल्यास त्याचा वापर झाल्यावर पुन्हा गरम कपडय़ांत गुंडाळून
ठेवा.
- कितीही ऊन-पाऊस पडला तरी कानटोपी (मंकी कॅप) कधीच काढू नका.
- समुद्रसपाटीपासून १0 हजार फुटांवर पोहोचल्यावर वातावरणाचा परिणाम यात्रेकरूवर
होतो. तो काहीसा चिडचिडा बनतो. यात्रेकरूंनी संयम पाळावा.
- संपूर्ण प्रवासात दिवसातून तीन ते चार लिटर पाणी अवश्य घ्या व ग्लुकॉन-डी
व इलेक्ट्रॉन पावडरचा वापर करा.
- कैलासाला परिक्रमा आखून दिलेल्या मार्गानेच सावकाश करा.
- साथीदाराची वाट पाहा. जोडीने प्रवास करा. आपल्यासोबत जवळचा मित्र किंवा नातेवाईक
असणे केव्हाही चांगले असते.
- डोलमा पास येथे जास्त वेळ थांबू नका. ते अत्यंत उंचावर आहे. ऑक्सिजनचे प्रमाण
कमी आहे. त्यामुळे डोलमा
देवीचे दर्शन होताच त्वरित खाली उतरा.
- आरतीचे, पूजेचे सामान तेथे
काहीच मिळत नाही. शक्यतो घरातून सर्व वस्तू घेऊन जाव्यात.
- संपूर्ण प्रवासात एका एअर बॅगेत सुकामेवा, खाण्याचे, पूजेचे सामान, कॅमेरा, पाण्याच्या बाटली सदैव जवळ असू द्या.
- जास्त खोल पाण्यात जाऊ नका. आखून दिलेल्या जागेजवळ स्नान करा
- होमहवन, तर्पन मानसरोवराच्या
काठी करा.
- यात्रा पूर्ण झाल्यावर काठमांडूला येताना वातावरणाच्या बदलामुळे भोवळ किंवा गरगरल्यासारखे वाटते. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. काही दिवसांनी शारीरिक स्थिती पूर्ववत होईल.
Masai Mara National Reserve
-
Masai Mara National Reserve is a large game reserve in Narok County, Kenya,
contiguous with the Serengeti National Park in Mara Region, Tanzania.
Ma...
5 years ago
No comments:
Post a Comment