अभिनेते शरद पोंक्षे आग्रह करीत
होते फक्त अकरा मिनीटं त्या काळ कोठडीत बसून अनुभव घ्या. काय वाटतं..... कसं
वाटतं....
अंदमांच्या सेल्युलर जेल मध्ये आपण कधी
गेलात तर त्या कारागृहामधल्या कुठल्याही कोठडीत फक्त अकरा मिनीटं बसून बघा. मी तो
अनुभव घेतलाय. हे आपण आपल्या इच्छेने करतोय, कुठल्याही क्षणी आपण बाहेर जावू शकतो,
इथे आपल्यावर कुठलच बंधन नाही हे सर्व माहित असूनही ती ११ मिनीतं तिथे असह्य होतात
हा स्वानुभव आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी तिथे ११ वर्षं महाभयंकर
अशा यमयातना भोगल्या. आणि त्या भोगत असताना कमलासारखं महाकाव्य लिहिलं, पंगतीभेद विसरायची
दिक्षा दिली, कैद्याच्या अंगीचा बाणेदारपणा जिवंत ठेवला. वास्तवीक क्षणोक्षणी आत्महत्येचेच
विचार मनात यावेत अशीच तिथली स्थिती होती. तसे ते भोग भोगत असताना प्रत्येक क्षणी केवळ
देशाचाच विचार वीर सावरकरानी केला होता.
आज रम्य वाटणार्या त्या कारागृहात गेल्यावर
जर आपण त्या कोठडीत गेलात आणि ११ मिनीटं जरी थांबलात तरी मनाला, शरीराला ज्या यातना
होतात त्यांचा अनुभव घेतला तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशासाठी काय प्रकारची
शिक्षा भोगली याची पुसटशी तरी कल्पना येते.
आज वीर सावरकरांची जयंती, गेल्या पुण्यतिथीला
घेतलेला तो अनुभव आठवला. काळाच्याही पुढे जावून सावरकरानी या देशाचा जो विचार केला
तो किती योग्य होता त्याची आपणाला अगदी रोजच्या रोज जाणीव होत असते. नुकतच चीनने जे
अतिक्रमण केलं ते त्याचं ताजं उदाहरण आहे, याच संदर्भात भारतीय नौदलातील माजी अधिकारी
विनायक श्रीधर अभ्यंकर यांचा लोकसत्तामध्ये आज प्रसिद्ध झालेला लेख स्वातंत्र्यवीर
सावरकरांच्या विचारांचं महत्व अधोरेखीत करतो. तो लेख जरूर वाचा:
No comments:
Post a Comment