कधी पंतंग होऊन वार्यावर झुलताना
कधी नीलनभावर विहंगासम फिरताना
तू डुलवशील जणू बाळ असे मी तान्हा
हळूवार असे तो झोका सावरताना
आच्छादीत जाशी आसमंत तव मायेचा
पसरला लांबवर गालीच्याच पाचूंचा
तू दिसशी सर्वदूर अब्ज अब्ज बाहूंचा
मी उभा इथे हा माथा की स्वर्गाचा
हलक्याहून हलके तनमन आज जहाले
कधी उठले होते प्रश्न तेही निमाले
काजळ काळे डाग दूर दूर गेले
नी तुझेच ते रुप जवळी माझ्या आले
निमिषात उडाले भाव मनीचे खिन्न
कापुरासम विरती होती क्षणात भिन्न
तू हृदयी गाशी मस्त होवूनी तान
किती मोद वाटतो आज हरपले भान
भूतानमधल्या टकसंग गुंफेचा ट्रेक करताना
वर पोहोचल्यावर उचंबळून आलेल्या भावना. नितांतसुंदर हिमालयात गेल्यावर हे असं
होतं.
नरेन्द्र प्रभू
No comments:
Post a Comment