07 October, 2010

उपनगरी रेल्वे प्रवाशांचा छळ

 
सध्या मुंबईतील उपनगरी रेल्वे प्रवासी मुख्यतः पश्चिम रेल्वेचे प्रवासी ज्या त्रासाला सामोरे जात आहेत त्याला तोड नाही. मध्यंतरी मोटरमनचा संप, आंदोलनं झाली. सर्वच राजकिय पक्षांनी प्रवाशांची बाजू उचलून धरल्याने त्या मोटरमननी आपला संप मागे घेतला पण त्या नंतर रेल्वे वाहतूकीत काही फरक पडल्याचं जाणवत नाही. उलटपक्षी दिवसेंदिवस प्रवाशांच्या हालात भरच पडत चालली आहे. आपल्या समोर रल्वे प्रशासनाला नमवण्यासाठी मोटरमननी नवनव्या क्लुप्त्या योजल्या आहेत आणि जनतेला कसं पिडता येईल हेच पाहिलं आहे.

अगोदर ज्या प्रवासाला अर्धा तास लागत होता त्याच प्रवासाला आता पन्नास मिनीटं लागतात. गाड्याना होणारा दहा पंधरा मिनीटं उशीर हा नेहमीचाच झाला आहे. प्रत्येक स्टेशनात गाडी शिरतानाच ती आगदी स्लो करूनच आणली जाते, तसच गाड्यांचा वेग कमी केल्याने जाम रखडपट्टी होते. सध्या ऑक्टोबर हिटच्या दिवसात गाड्या तुडूंब भरून जात असताना पंखे बंद ठेवणे, दोन स्टेशनच्या मध्ये बराच वेळ गाड्या थांबवल्या गेल्या तरी काहीही माहिती न देणे या मुळे प्रवासी हैराण होत आहेत. सकाळच्या वेळी तर या कुर्म गतीमुळे नोकरदारवर्गाची मस्टर चूकत आहेत. अशा परिस्थितीत प्रवाशांचा उद्रेक झाला किंवा ते ममता बॅनजीला आवडणार्‍या नक्षलवाद्यांच्या मार्गाने गेले तर चूक कुणाची?           

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates