‘आताच्या परिस्थितीत मतदान करणं किती निरर्थक झालयं हे सगळ्यानाच माहीत आहे.’ ‘गांगल ७० ग्रंथाली ३५’ मध्ये दिनकर गांगलांचं हे विधान जेव्हा मी वाचलं तेव्हा इतकी काय आपली लोकशाही वाईट नाही असं मला वाटलं होतं, पण अगदी थोड्याच दिवसात त्याचा प्रत्यय आला. त्याचं काय झालं, माझा एक मित्र, जो मुळचा उत्तरप्रदेश मधला आहे, चार-पाच दिवसांसाठी गावी जायला निघाला आहे. मुंबई-दिल्ली हा प्रवास आणि पुढे दहा तासांचा प्रवास करून जायचं आणि पाच दिवसात परत यायचं म्हणजे भारीच आहे. एवढ्या घाईत जाऊन येणार म्हणजे काम ही तसच महत्वाचं असणार म्हणून विचारलं तर म्हणाला ओळखीला एक माणूस ग्रामपंचायतीच्या निवडणूकीला उभा राहिला आहे. गेलं वर्षभर तो या निवडणूकीच्या वेळी मला मतदान करण्यासाठी ये असा लकडा माझ्या सदर मित्राकडे लावत आहे. आता प्रत्यक्ष निवडणूक आली तर त्या गृहस्थाने माझ्या मित्राचं येण्या जाण्याचं रेल्वेचं थ्री टायर ए.सी. चं तिकीट आणि वाटेत खर्चासाठी पैसेही पाठवले आहेत.
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीला एवढं महत्व कधीपासून आलं? एक माणूस पंच आणि झालाच तर पुढे सरपंच होण्यासाठी माणसी जवळ-जवळ पाच हजार खर्च करतो म्हणजे काय? हे परवडतं कसं? मुळात गाव पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारी पैसा येतो काय? आणि आलाच तर तो त्या पंच आणि सरपंच यांना स्वाहा करता येतो का? भ्रष्टाचाराची गंगा अशाप्रकारे खेलग्राम ते गंगाग्राम आली आहे काय? हे राम.........! गावाकडे चला, कशासाठी याचसाठी का?
‘स्थिरचर व्यापून तो जगदात्मा दशांगुळे उरला’, या उक्ती प्रमाणे भारतात राजकारणाचे झाले आहे. तरी पण आजचा सुशिक्षित तरुण वर्ग समाज राजकारणा पासून लांब का राहतो हे एक न सुटणारे कोडे आहे. लांबच राहतो असे नाही तर त्या विषयी बोलण्याचे सुद्धा टाळतो. आमच्या एकाने काय होणार असा निराशवादी सूर गाण्यापेक्षा राजकारणावर कमीत कमी बोला तरी. आपल्या या वृत्ती मुळे बेकायदेशीर राजकारण्यांचे फावते. . त्यांना तुमच्या सारखी माणसे नकोच आहेत याचा अर्थ तुम्ही सुद्धा तो प्रांत आपला नाही म्हणून कसे चालेल.
ReplyDeleteनरेंद्र,
ReplyDeleteतुम्ही उपस्थित केलेली शंका रास्त आहे पण यातून आणखी एक गोष्ट जाणवते जी निदान positive आहे. आपल्या मित्राच्या मित्राने माणशी पाच हजार खर्च केलाय ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी. उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये बोगस मतदानाची खानदानी परंपरा असताना हजारभर रुपयात बोगस मतदार पाठवता आला असता पण त्याने निदान तेवढे केले नाही.
प्रधान साहेब, ती ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने कदाचीत सगळेजण एकमेकाला ओळखत असणार त्यामुळे बोगस मतदार पाठवेणे शक्य झाले नसावे.
ReplyDelete