नको नको रे पावसा
असा घालू धुडगूस
गेला दसरा सरून
आले दिवाळीचे दिस
तुझ्या संगे वारा वेडा
हालवतो झाडा पेडा
विज करीते कडाडा
असा करू नको राडा
किती अधीर झालास?
आज दिस आहे खास
कशी करू मी आरास?
जीव होतो कासावीस
झाली ना रे लगबग
पाहूण्यांची लागे रांग
आता जरा धर तग
माझा होई राग राग
तुला बोलावले नाही
हाच गुन्हा कारे होई?
समजून जरा घेई
नको ना रे करू घाई
पिक हाताशी आलेले
असे मातीमोल झाले
रिण फेडू कसे सांग
पापणीत आले ढग
नको नको रे पावसा
far chan kavita aahe....nako nako re pavsa...
ReplyDeleteManisha:
मनिषा, आता हा अवेळी पडणारा पाऊस सगळ्यानाच नकोसा झालाय.
ReplyDeleteकविता छान झाली आहे.
ReplyDelete'पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा'
विजयजी, आपण म्हणता ते बरोबर आहे. आपण पराधीनच आहोत, निसर्गापुढे काय चालत नाही म्हणून कविता लिहिली.
ReplyDeletekavita khup chaan ahe
ReplyDeleteमला तुमची ही कविता खुप आवडलीय... आणि मी या पोस्टची लिंक माझ्या फेसबुकवर दिली आहे. चालेल ना?
ReplyDeleteमृण्मयी, धन्यवाद.
ReplyDelete