24 January, 2019

बोगीबिलचं राष्ट्रार्पण







काही दिवसांपुर्वी ब्रह्मपुत्र नदीवरच्या देशातील सर्वात लांब डबल डेकर रेल्वे आणि रस्ते पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

आसाममधील दिब्रुगढजवळील बोगिबिल येथे ब्रह्मपुत्र नदीवर बांधलेला हा पूल सुमारे ४.९४ किमी लांब आहे.

सुरक्षा धोरणांच्या दृष्टिकोनातून हा पूल खूप महत्वाचा मानला जातो. प्रचंड लष्करी टॅंकर  या पुलावरून सहज पार होऊ शकतात.

१९६२ च्या युद्धानंतर या पुलाची मागणी केली गेली होती. तसंच १९८५च्या  आसाम कराराच्या हा पुला हा एक भाग होता. मोदी सरकार २०१४ साली सत्तेवर येताच त्यानी या पुलाच्या बांधणीत लक्ष घातलं आणि कित्येक दशकं रेंगाळणारं हे काम अत्यंत वेगाने पुर्ण करीत तो वाहतूकीसाठी खुलाही केला.

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे एक कारण आहे.

या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश दरम्यानचा प्रवास चार तासांनी कमी होईल. आणि तो 3 तासांत पूर्ण करता येईल.

सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या पुलाची अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागात पोहोचण्यासाठी भारतीय सैन्याला मदत होईल.



23 January, 2019

स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी लेह आणि कारगिल नॅशनल पॉवर ग्रिडला जोडली गेली आहेत






वर्षाच्या सुरूवातीस आपल्या देशाने आणखी एक नवीन यश मिळविले आहे. स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी लेह आणि कारगिल ही ठिकाणं आता नॅशनल पॉवर ग्रिडमध्ये सामील झाली आहेत. हे काम पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि या प्रकल्पातील गुंतवणूकीमुळे पूर्ण झाले आहे. आता 220 केव्ही लेह-कारगिल-ऑल्स्टेंग सिंगल सर्किट ट्रांसमिशन लाइन 330 किलोमीटरपर्यंत वीज पुरवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. या प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर, देशाच्या या उत्तरी भागांमध्ये २४x वीज पुरविली जाईल. पूर्वी ते कोणत्याही पॉवर ग्रिडशी जोडलेले नव्हते. याच कारणासाठी लेहला वीजेसाठी लहान हायड्रो-प्लांट्सवर अवलंबून राहावे लागत होतं. २०१३ पुर्वीपर्यंत तर या भागात डिझेल वरच्या जनरेटवरच सारी भिस्त होती. परंतु आता नॅशनल पॉवर ग्रिडला जोडले गेल्याने लेहला पुरेशी वीज मिळेल.


२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे एक कारण आहे.  

https://hindi.rightlog.in/2019/01/leh-kargil-national-grid-02/

https://timesofindia.indiatimes.com/india/ladakh-kargil-finally-plug-in-to-national-power-grid/articleshow/67547103.cms


22 January, 2019

‘उरी’ आतंकी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईक



२००६ मुंबई लोकल ट्रेन्समध्ये झालेले स्फोट, २००७ साली समझौता एक्सप्रेसमध्ये झालेले स्फोट, २००८ मुंबईवरचा आतंकी हल्ला, २००८ अहमदाबाद स्फोट,  २००८ बंगलोर स्फोट, २०१० पुणे जर्मन बेकरीत स्फोट, २०११ मध्ये मुंबईत पुन्हा झालेले स्फोट, आझाद मैदानात रझा अकादमीने केलेला थयथयाट, महिला पोलिसांची त्यात झालेली मानहानी अशी एकामागोमाग एक बॉम्बस्फोटांची आणि अतिरेकी हल्ल्यांची जंत्री भारतातल्या लोकांना काँग्रेस सरकारच्या राज्यात आगतिकपणे सहन करावी लागली आहे. वर 'बडे बडे देशोमें ऐसी छोटी छोटी बातें होती रेहेती है हा उद्दामपणाही ऐकावा लागला आहे. 'उरी' च्या  निमित्ताने थिएटरमध्ये भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा लोकांना वाटणारा अभिमान ही त्या सगळ्या क्षणांची आणि हल्ल्यांची मनात साचलेली अगतिकता असते.

उरीच्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्सनी ही अगतिकता नाहिशी केली. कोणीही यावं आणि टपली मारून जावं, असा भारत आता उरलेला नाही.

पुन्हा मोदीच का? याचं हे एक कारण आहे.  


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates