आजचा हा कळीचा मुद्दा आहे. गेली ४४ वर्ष शिवसेना आणि मराठी माणूस असं समीकरण होतं. त्या मुळेच केवळ त्या मुळेच छगन भुजबळ जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांना पद्मसिंह पाटलांच्या बंगल्यावर आसरा घ्यावा लागला. ती दहशत मराठी माणसाचीच होती. आता सदा सरवणकर राजरोस फिरतात तेव्हा त्याना अडवणारा कुणी नाही. ही अवनती का झाली? सत्तेवर आलात तेव्हा काय केलं? महापालिकेत सत्ता आहे मग अनधीकृत झोपड्या कशा उभ्या रहातात? चाळीस लाख झोपडपट्टी वासियांना मोफत घरे ही घोषणा झाली तेव्हा त्याना ती मिळाली नाहीत, पण त्या वेळपासूनच भैयांची आवक मात्र वाढाली. कृपाशंकर मुंबई प्रदेश कॉंग्रेसचा अध्यक्ष होतोच कसा? आणि त्याच्या घरी उद्धव ठाकरे गणपतीला जातातच कसे? मराठी माणूस हे कसं विसरेल? का विसरावं? कृपाशंकर मुंबई प्रदेश कॉंग्रेसचा अध्यक्ष होतो हा केवळ कॉंग्रेसचा प्रश्न नाही तो मुंबई आणि महाराष्ट्राचाही प्रश्न आहे. आता अशोक चव्हाणांच्या जागी त्याला बसवला तर चालेल का? तो संजय निरूपम त्याला कुणी पोसला? त्याला राज्यसभेचा खासदार कुणी केला ? आता तो भैयांसाठी वेगळे मतदार संघ मागतोय. कुठल्याही भाषेला विरोध असता कमानये पण मराठीला कुणी केलडावून दाखवणार असेल तर त्या माकडाच्या शेपटीला कोलीत लावायला नको? मराठी पाट्या लावा होssss म्हाणून का सांगावं लागतं? राज ठाकरेंनी मुद्दा उचलून धरला की लगेच दुसर्या दिवशी तो आमचच मुद्दा म्हाणून सांगायच आणि गप्प बसायचं. कृती कोण करणार? राज ठाकरेंनी ती केली म्हाणून लोकं त्यांच्या मागे गेली. जनतेला भुतकाळावर जगता येणार नाही. बाळासाहेबानी तेव्हा आवज उठवला लोक त्यांच्या बरोबर होते. आज राज ठाकरे ते काम करताहेत मग लोक त्यांनाच पाठींबा देणार. विधिनिषेध शुन्य भैये कुणाला टरकतात ते महत्वाचं. अग्रलेखातून गळा काढून काय साधणार? त्या पेक्षा उद्धव ठाकरेंनी लोकांसमोर यावं.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
सहमत आहे. अहो जर उध्दव ला कांही करायचं असेल तर हिच वेळ आहे. एकदा वेळ की मग फक्त ट्रेड युनियन्स घेउन बसावं लागेल
ReplyDeleteमहेंद्रजी, उद्धव ठाकरेंनी निदान मिडीया समोर तरी यायल नको काय? गेले कुठे ?
ReplyDeleteआज तीन दिवस झाले निकाल लागुन पण शिवसेना प्रतिक्रिया न देता गप्प आहे, काय करवा शिवसैनीकानी? मराठी जनतेने? शिवसेना..आता तरी बोला राव...आता तरी
ReplyDeleteउद्धव यांनी पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारलेला दिसत नाहीय. कमीत कमी मिडिया समोर येऊन गळपटलेल्या शिवसैनिकांना धीराचे बोल तरी बोलायला हवे होते. जर का नेतृत्वच असे गळपटले तर सैनिक नक्कीच सरबरीत होऊन जातील.
ReplyDeleteराज यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. पाहूया काय करतात ते.
लेखाशी पुर्णपणे सहमत.....उद्धव ठाकरेंनी केवळ एकदाच त्या भय्यांच्या ट्रेननी दादर ते नासिक प्रवास करावा....त्यांच्या अरेरावीचे अनेक नमूने पहायला मिळतील....ती ट्रेन त्यांची असते, मग ही जागा आमची आहे हा मुद्दा कसा होत नाही......हाताबाहेर परिस्थिती जाण्यापुर्वी त्यांनी पराभव खिलाडूवृतीने स्विकारावा आणि आत्मपरिक्षण करावे....
ReplyDeleteलेखाशी पुर्णपणे सहमत.....उद्धव ठाकरेंनी केवळ एकदाच त्या भय्यांच्या ट्रेननी दादर ते नासिक प्रवास करावा....त्यांच्या अरेरावीचे अनेक नमूने पहायला मिळतील....ती ट्रेन त्यांची असते, मग ही जागा आमची आहे हा मुद्दा कसा होत नाही......हाताबाहेर परिस्थिती जाण्यापुर्वी त्यांनी पराभव खिलाडूवृतीने स्विकारावा आणि आत्मपरिक्षण करावे....
ReplyDeleteप्रविण, उद्धवना माझं काय चुकलय? हाच प्रश्न पडला असावा.नोकरी बदलतात तसा नेतृत्वात बदल झाला की असं व्हायचच.
ReplyDeleteसुहास, कोण कुणासाठी थांबत नाही. त्यानी पराभवाला सामोरं जावं हे उत्तम.
ReplyDeleteतन्वी, उद्धव ठाकरें आता म्हणताहेत पराभव मताठी माणसाचा, आता मात्र हद्द झाली.
ReplyDelete