आज दिवाळीचे चार दिवस संपत आले. मागे उरला फटाक्यांचा कचरा, धुर आणि काजळी, आणि हो ठाण्यात अग्नीशमन दलाच्या सात जवानांचे मृतदेह. दिवाळी पहाट सारखे स्तुत्य उपक्रम एका बाजूला आणि दुसर्या बाजूला गल्ली-बोळात, रस्त्या-रस्त्यावर अनिर्बंधपणे वाजवले जाणारे फटाके. हल्ली मुलांचे डॉक्टर पालकांना सांगतात ‘चॉकलेट आइस्क्रीम तो बच्चोंका हक है’ त्याच चालीवर पालक मुलांबरोबर स्वतःही फटाके वाजवण्याचा हक्क बजावताना दिसले. भल्यापहाटे पासून रात्री उशीरा पर्यंत वेळेची मर्यादा ओलांडून हे बजावण चालू होतं. हे ताळतंत्र सोडून वागणं नेहमीचच झालं आहे दिवाळी फक्त निमीत्त. आता बाविस तारखेला कुणीही निवडून येवो फाटाक़्यांपासून होणारं प्रदुषण मात्र तेवढच असणार याची खात्री देतो.
हे असे विनाशकारी फटाके पर्यावरणाचं दिवाळं वाजवतातच पण चीनी बनावटीचे हे फटाके वाजवून आपणच चीनच्या अर्थव्यवस्थेला भक्कम करतो आहोत. दुसरा मुद्दा असा की नुकत्याच परतणार्या मांसूनने “ग्लोबल वॉर्मींगचे’ धोके स्पष्ट केले आहेत. सिंधुदूर्ग जिल्ह्यात एका दिवसात एवढा पाऊस पडला की त्याने मागचे सर्व विक्रम मोडले. विध्वंस केला. जागतिक तपमान वाढीचा हा धोका आता आपल्या दारात नव्हे घरात आला आहे. आता घश्याचे,द्म्याचे विकार बळावतील, आवाजाचा त्रास तमाम जनतेला झाला असणारच (वाजवणार्यानादुद्धा होतो, ते कानात बोटं घालून वाजवतात). या सर्व गोष्टी सर्व प्रकारच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा संगितल्या जात आहेत पण....., आपण स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारून घेतली तर त्याला कोण काय करणार. आपण येवढच म्हणू शकतो, देवा याना माफ कर ते आपल्या बरोबर आमच्याही पायावर कुर्हाड चालवताहेत.
भानस, माझ्या ब्लॉगवर आपलं स्वागत. दर्दी लोकांची गर्दी पाहून बरं वाटतं.
ReplyDelete