08 October, 2009

यांचा माज आपणच उतरवू शकतो...!!!


बर्‍याच राजकारण्यांनी आपली पोरं-टोरं, नातेवाईक निवडणूकीत उतरवले आहेत. आपण स्वतः आणि बरोबरचा गोतावळा सगळेच विधान सभेत गेले की मग मंत्री, मुख्यमंत्री पदासाठी लॉबींग करताना घरचेच लोक असलेले बरे. या आधी राजकारण करताना ज्यांनी सर्वात जास्त विश्वासघातकी खेळी केली ते आता पासूनच सावध झाले आहेत. एकाच छताखाली खासदार, आमदार पिता-पुत्र एकत्र असले की त्याना राजकीय दृष्ट्या वजन प्राप्त होईल आणि अधिकाधिक पदं पदरात पाडून घेता येतील. एकदा का आपण निवडून आलो की पाच वर्ष अनिर्बंध सत्ता उपभोगायला मोकळे, फ्क्त या निवडणूकीचाच काय तो अडसर आहे. पण आपण त्याना हा अडसर पार करू देता नये. आपण जिवंत आहोत, तेव्हा अशाना वेचुन बाजूला काढले पाहीजे. नाहीतर नंतर ते आपल्या टाळूवरचं लोणी खायला येणार, त्याना आताच पाडलं पाहीजे. खरच त्याना पाडलं पाहीजे. (आजच्या लोकसत्तात मधलं संजय पेठेंचं सदर ‘थर्ड आय’ वाचाच.)


2 comments:

  1. अगदी बरोबर आहे!!!! पण याची जाणीव सर्वांना होणार का???खुशालचेंडु समाजाला आपल्या सामाजिक कर्तवयाचा विसर पडत चालला आहे.

    ReplyDelete
  2. Namskar Prabhu saheb...
    Aapan maaz likhan, aapalya Blog var prasiddha kelaya baddal, mi aapal aabhari aahe.
    maze vichar jar aapanas patat astil, tar tyacha avashy Prasaar karava..
    Dhanywaad !

    Dhanywaad, Aapla
    SANJAY PETHE

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates