दवणे सरांचं लिखाण जेव्हा केव्हा पहिल्यांदा वाचलं तेव्हा पासूनच खरं तर मी त्यांच्या प्रेमात पडलो. मुंबईत आल्या पासून एकदातरी प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा होती, त्यांचा ‘दिलखुलास’ कार्यक्रम बघायचा होता पण तशी संधी काल पर्यंत आली नव्हती. काल ‘स्वप्न बघा स्वप्न जगा’ या कार्यक्रमात सरांशी प्रत्यक्ष बोलण्याची संधी मिळाली, त्यांचे अमृताचे बोल ऎकले, दिवाळीत हा आनंद सोहळा अनुभवता आला. शब्दांची ताकद, भावनांचे तरंग एकूणच विचारांची दिवाळी काल खर्या अर्थाने साजरी झाली, त्याचा एक भाग होता आलं.
‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’ हे भक्तिगीत एखाद्या संताला भगवंता विषयी वाटणार्या प्रेमातून, जिव्हाळ्यातून, भक्तितून जन्माला आलं असं कोणालाही वाटेल. ते भक्तिगीत परंपरागत म्हणूनही समजणारे कमी नाहीत. ते भक्तिगीत दवणे सरांनी लिहीलेलं आहे हे जेव्हा गुरूभक्तांना कळेल तेव्हा सरांच्याच दर्शनाला रांगा लागतील अशी स्थिती आहे हे मी नसोबाच्यावाडीला जावून आलो तेव्हा मला समजल. कालच्या व्यख्यानाचा ‘हॅंगओव्हर’ अजून उतरला नाही. त्यातून बाहेर आलो, ते मनात उतरलं म्हणजे त्या विषयीचं पोस्ट लिहीनच. तोपर्यंत मनाची कवाडं उघडली गेली, सरांच्या ‘दिलखुलास’ बोलण्याने ‘दिल खुल गया’ एवढं मात्र नक्की.
No comments:
Post a Comment