(गेल्या मार्च महिन्यात महात्मा गांधींच्या वापरातल्या वस्तूंचा लिलाव झाला. त्या वस्तू विजय मल्ल्यांनी विकत घेतल्या असं वर्तमानपत्रामध्ये वाचलं, तेव्हाच सुचलेली ही कविता आज गांधी जयंती निमित्त,)
तुमच्या चपला, तुमचं घड्याळ
तुमची वाटी, तुमचं ताट
फिरंग्यांच्या हाती होतं
पैशासाठी घातला घाट
लिलावात ठेवला होता
तुमचा चष्मा करून साफ
बोली सारेच लावत होते
ग्लास भरला होता हाफ
तत्वांना तुमच्या आम्ही
दिली कधीच तिलांजली
पैशाचीच दुनिया बापू
आय्.पी.एल्. ची लावतो बोली
सत्य, अहिंसा, दारूबंदी
हीच तुमची शिकवण खरी
’लिकर’चेच किंग आता
करू लागलेत गांधीगिरी
शुद्ध चारित्र्याच्या गप्पा
आम्ही सारेच मारतो मॉप
राष्ट्रपिताच तुम्ही आमचे
कराल ना आम्हाला माफ ?
नरेन्द्र प्रभू
Khrach Apratim kavita aahe....
ReplyDeletekhupach Chan Aahe...