दुसर्या महायुद्धादरम्यानची गोष्ट. एक जपानी सैनिक युद्धात पकडला गेला. नाशिकमध्ये तो युद्धबंदी म्हणून स्थानबद्ध होता. सिगारेटचं त्याला व्यसन होतं. तो सतत सिगारेट ओढत असे. एका दिवशी त्याची काडापेटी संपली म्हणून ती विकत घेण्यासाठी त्याला बाजारात जायचं होतं. दोन पोलिस आणि तो अशी वरात बाजारपेठेतून निघाली. काडापेटी मिळण्याची शक्यता असलेल्या प्रत्येक दुकानात तो जायचा आणि पुन्हा काडापेटी न घेताच मागे परतायचा. तो दिवस तसाच गेला. दुसर्या दिवशी पुन्हा वरात निघाली शेवटी एका दुकानात त्याने काडापेटी विकत घेतली. एक अकाडापेटी विकत घेण्यासाठी त्याने एवढा वेळ का लावला, तर त्याला स्वतःच्या देशात तयार झालेलीच काडापेटीच विकत घ्यायची होती. ज्या वेळी त्याला ‘Made in Japana’ काडापेटी मिळाली तेव्हाच त्याने ती विकत घेतली. स्वदेशी वस्तू विकत घेण्यासाठी त्याने आपलं व्यसनही बाजूला ठेवलं.
प्रकाशभाई मोहाडीकरांनी सांगितलेली ही गोष्ट ऎकून मला आत्मपरिक्षण करावसं वाटलं. आपण असा विचारतरी करतो का ? मंदीच्या या काळात रोजच्या रोज आपण किती विदेशी बनावटीच्या वस्तू विकत घेतो. देशप्रेम रक्तातच असावं लागतं एवढं खरं.
No comments:
Post a Comment