गेले दहा महीने मी ब्लॉग लिहीत आहे. मुंबईवर अतिरेक्यांचे हल्ले झाले आणि पहिले दोन दिवस फारच अस्वस्थतेत गेले. हल्ले चालूच होते आणि मनातली कोंडी फोडण्यासाठी मी ब्लॉग लिहायला घेतला. त्या नंतर लिहीतच गेलो, कधी कमी कधी जास्त. इथे एक बरं असतं, आपले आपणच संपादक आणि मालक त्यामुळे काय लिहावं किती लिहावं याच्यावर बंधन नसतात. साहित्याचे सगळे प्रकार हाताळता येतात. यापुर्वी मी एवढं लिखाण केलं नव्हतं. लिहीलं तरी वाचणार कोण हा प्रश्न होता. महाजालावर तो प्रश्न नसतो. कसही असलं तरी कोण ना कोण वाचतोच. थोडे दिवस झाले तसं लक्ष ठेवणार्यांचं प्रमाण वाढत गेलं. चांगल्या प्रतिक्रीया यायला लागल्या, उत्साह वाढला. ब्लॉग मुळे अनेक मित्र झाले, तसे जुने संपर्क नसलेले मित्र पुन्हा संपर्कात आले. महाजालाचा आपण एक भाग आहोत ही कल्पनाच किती सुखद आहे. युनिकोड ही प्रादेशीक भाषांना नवसंजीवनीच आहे. युनिकोड मुळेच तर हजारो मराठी ब्लॉग लिहीले जात आहेत. मी सुद्धा लिहीत राहीन, आपण प्रतिक्रीया देत रहा. उत्साह वाढेल.
नरेन्द्र प्रभू
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
No comments:
Post a Comment