सोसाट्याचा वारा, वर पावसाच्या धारा
शेतावर मला, वेळ झाला जरा
पाऊले पडती, अशी झरा झरा
जड झाले ओझे, जाते आता घरा
काय झाले असे ? कुठे गेले घर ?
उभे होते इथे, याच वाड्यावर
पडले..., पडले... लागली नजर
आकांत जाहला सुटला हा धीर
निजले चौफेर, मोडलेले घर
किडूक-मिडूक आणि नवे दार
कुठे नाही थारा, नागडे छप्पर
हताश झालेला, धाकला हा दिर
कोंबडा उभा तो पाशीटाच्या वर
खुराड्याला त्याच्या मातीचा हा भार
मोती हा भुकेला, पोटचाच पोर
रडला, निजला, त्याचा जीवा घोर
दर्याचा दरारा, पावसाचा मारा
सावरू कशी या मोडलेल्या घरा
फुटले नशीब, तुटला आधार
वाहू तरी कसा संसाराचा भार
नरेन्द्र प्रभू
No comments:
Post a Comment