07 April, 2019

‘शत्रू मालमत्तां’ची विक्री



माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी विप्रो लिमिटेडमधील शत्रू पक्षाच्या ताब्यात असलेल्या समभागांची एलआयसी आणि अन्य दोन सरकारी विमा कंपन्यांना विक्री करून केंद्र सरकारने सुमारे १,१५० कोटी रुपयांचा महसूल कमावल्याचे जाहीर केले.

भारतातून पाकिस्तान अथवा चीनमध्ये स्थलांतरित झालेल्या आणि भारताचे नागरिकत्व संपुष्टात आलेल्या लोकांच्या मालकीच्या संपत्तीचे केंद्र सरकारने ‘भारतातील शत्रू मालमत्तेचे पालक’ अशा विशेष कंपनीखाली एकत्रीकरण केले असून, तिच्याकडून दुश्मन मालमत्ता आणि भांडवली समभागांची काळजी वाहिली जाते. विप्रोतील शत्रू पक्षाच्या एकूण ४.४३ कोटी समभाग प्रत्येकी २५८.९० रुपये किमतीला विकून १,१५० कोटी रुपये सरकारने मिळविले असून, ते केंद्राच्या निर्गुतवणूक महसुलात जमा झाले आहेत.

एलआयसीने यापैकी सर्वाधिक ३.८६ कोटी समभाग खरेदी केले आहेत. बरोबरीने जीआयसी आणि न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स या सामान्य विमा कंपन्यांनी खरेदीत सहभाग घेतला.

शत्रू मालमत्ता कायदा, १९६८ नुसार, ‘शत्रू मालमत्ता’ म्हणजे शत्रू राष्ट्रातील लोकांच्या, मालकीच्या अथवा शत्रूच्या वतीने व्यवस्थापित मालमत्ता असा संदर्भ आला आहे. या मालमत्ता, विशेषत: स्थावर जंगम मालमत्ता गेले काही दशके हे विनावापर पडून होत्या. नोव्हेंबर २०१८ मध्ये सरकारने या मालमत्तांच्या विल्हेवाटीची पद्धत निश्चित करून, त्यानुसार विप्रोतील समभागांची झालेली ही पहिली विक्री आहे.

30 March, 2019

टेरर फंडीगला मोदी सरकारचा दणका


टेरर फंडीगला मोदी सरकारने जोरदार दणका दिला आहे. श्रीनगर मध्ये वर्षानुवर्षं ठाण मांडून बसलेल्या आणि पाकिस्तानच्या पैशावर पोसल्या गेलेल्या दहशतवादाला नेस्तनाबूत करण्यासाठी टेरर फंडीगचा माग घेण्यासाठी सरकारने कृती गट स्थापन केला आहे.

मोदी सरकारच्या याच धोरणाला आता यश येत असून सक्त वसूली संचालयाने (ED) काल फुटीरतावादी नेता शाबीर शाह याची श्रीनगरमधील संपत्ती जप्त केली आहे. त्याला हाफिज सईदकडून पैशांचा पुरवठा होता होता. चौदा वर्षे जुन्या दहशतवाद अर्थपुरवठा  व काळ्या पैशाच्या प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले.

जम्मू काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगर येथील रावळ पोरा भागात एफंडी बाग येथे शहा यांची मालमत्ता असून ती जप्त करण्याचे आदेश सक्तवसुली संचालनालयाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दिले होते. सरकारने सध्या काश्मीरमधील फुटीरतावाद्यांवर कारवाईचा वरवंटा फिरवण्यास सुरूवात केली असून त्यात दहशतवादाच्या आर्थिक नाडय़ा तोडण्याचा हेतू आहे. शाबीर शाह व त्याची पत्नी यांच्या नावे २५.८ लाख रूपये किमतीचे हे घर असून ते जप्त करण्यात आले आहे. शाह हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याचा अनेक बेकायदेशीर कारवायांत हात आहे. त्याचा साथीदार महंमद अस्लम वाणी हा जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. शाह हा वाणी याच्या माध्यमातून हवालाचा पैसा गोळा करीत होता. हा पैसा  पाकिस्तानातून येत होता. सक्तवसुली संचालनालयाने म्हटले आहे, की १९९९ मध्ये  त्याच्या सासऱ्यांनी हे घर त्याच्या नावाने खरेदी केले होते. नंतर ते शाह याची पत्नी व मुलींना त्याच्या मेहुणीने भेट म्हणून दिले. शाह याचे सासरे व मेहुणी याना या घरासाठीचे पैसे कुठून आणले याचे स्पष्टीकरण करण्यासाठी बराच अवधी देण्यात आला होता. चौकशीत असे निष्पन्न झाले, की शाह हा या मालमत्तेचे खरा मालक असून त्यालाही सासऱ्याने हे घर कुठल्या पैशातून घेतले हे सांगता आले नाही.

हाफिज सईदकडून पैशांचा पुरवठा
शाबीर शाह हा जागतिक दहशतवादी हाफिज सईद याच्या संपर्कात होता व त्याच्याकडून दहशतवादी कारवायांसाठी पैसे स्वीकारत होता. अनेक संशयास्पद व्यवहार करून त्याने मालमत्ता जमवल्या असून शाह व वाणी यांना २०१७ मध्ये सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती. वाणी याला जानेवारी २०१९ मध्ये जामीन मिळाला आहे. ऑगस्ट २००५ मध्ये दिल्ली पोलिसांनी वाणी याला शाबीर शाह यांना २.२५ कोटी रूपये हवालामार्गे दिल्याच्या आरोपावरून अटक केली होती.    

29 March, 2019

टेरर फंडिंग: ११ हुर्रियत नेत्यांची संपत्ती जप्त होणार



आतंकवादाविरुद्ध मोदी सरकारने सक्त पवित्रा घेतला असून टेरर फंडिंगचं कंबरडं मोडण्याचा निर्धार केला आहे. गेले काही महिने चालू असलेली कडक कारवायी आणखी पुढे नेत टेरर फंडिंगमधून जवळ केलेली माया जप्त करण्याचं सरकारने ठरवलं आहे सरकारने ११ हुर्रियत नेत्यांची संपत्ति जब्त करण्याचा आदेश दिला आहे.


११ हुर्रियत नेत्यांमध्ये हिजबुल मुजाहिदीन चा मुख्य सैयद सलाउद्दीन, सैयद अली शाह गिलानीचा जावयी अल्ताफ फंटूश, नईम अहमद खान, फ़ारुख अहमद डार उर्फ बिट्टा कराटे, शहीदुल इस्लाम, पाकमध्ये असलेला हिज्बुल चीफ सैय्यद सलाउद्दीन, अकबर खंडी, पीर सैफुल्ला,राजा मेहराजुद्दीन यांचा समावेश आहे. सरकारने या सर्वाच्या संपत्तीची खातरजमा केली असून ही  संपती त्यांनी टेरर फंडीगमधून जमवली आहे.

सरकारने या सर्व फुटीरवाद्यांची गठडी वळव्याचा पूर्ण रोड मॅप तयार केला आहे.

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates