13 April, 2009

खरोखरच माणूस किती वाईट आहे !

आज एका इ-मेलने मला खुप अस्वस्थ केलं. ही छायाचित्र बघा काय सांगतात. समस्त सर्पयोनीचा आक्रोश एका इ-मेलमुळे मला ऎकू आला. माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो त्याचं हे एक उदाहरण.

एका क्षुद्र स्वार्थापोटी आपण दुसर्‍याचा जीव घेतो आणि त्याच्या कातड्यापासून बनवलेल्या वस्तु वापरून आपली प्रतिष्ठा वाढते हे कसं शक्य आहे ? पण आज तसचं घडतय. साप मारायचे आणि त्यांच्या कातड्यांपासून पर्स, पट्टे बनवायचे. या वस्तु बनवतात ते कदाचित गरीब असतील पण त्या वस्तु वापरणारे नक्कीच श्रीमंत असणार. आपली श्रीमंती मिरवण्यासाठी आपण काय करतोय हे कधी कळणार अशा लोकांना ?

सापांचा जीव जातोच पण पर्यावरणाची सुध्दा अपरिमीत हानी होते. पिकांना धोका उत्पन्न होतो. जैवसाखळी तुटून जाते. हे थांबवायलाच हवं. अशा वस्तु विकत न घेणं एवढं तरी आपण नक्कीच करू शकतो.

नरेन्द्र प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates