तो लडाखला
असा काही भिडला की लडाखने आणि लडाखींनींही त्याला आपलसं केलं. आपल्या स्वत:च्या
गावात जेवढा त्याला आपलेपणा वाटतो तेवढाच लडाखलाही वाटतो. लडाखवर जेव्हा ढगफुटीने
प्रहार केला तेव्हा तमाम पर्यटक आणि जनता लडाख सोडून जाण्यासाठी विमानतळावर
गर्दीकरून होती तेव्हा तो मात्र परदेशातून आल्या आल्या लडाखला दाखल झाला होता.
त्याच्या आश्वासक कृतीने तिथल्या अनेक लडाखी मित्रांना नक्कीच आधार मिळाला.
लडाख हिल
कौसील, जम्मू काश्मिर सरकारचा पर्यटन विभाग यानी आत्माचं वेळोवेळी कौतूक केलं आहे,
ते मोठ्या प्रमाणावर भारतीय पर्यटक लडाखला आणल्याबद्दल पण उन्हाळी पर्यटनाबरोबरच
लडाखच्या हिवाळी सहली सुरू करून त्याने इथल्या पर्यटनाचा चेहरा मोहराच बदलून टाकला
आहे. पर्यटनाचे चार महिने संपल्यावर मरमॅट सारखी गुडूप होणारी इथली हॅटेल्स आता
हिवाळ्यातही उघडी राहू लागली आहेत. नुकतच आमचं ‘लडाख प्रवास
अजून सुरू आहे’
हे पुस्तक प्रकाशीत झालं तेव्हा बोलताना आत्मा म्हणाला होता की आता मी जो काही आहे
ती लडाखचीच देन आहे. एवढा तो लडाखशी एकरुप झाला आहे.
त्याच्या
पहिल्यावहील्या लदाख सफरीचा थरार ‘लडाख प्रवास अजून
सुरू आहे’ या पुस्तकात
आपल्याला वाचायला मिळाला आहेच पण त्या घटनेनंतर तब्बल शंभरवेळा लडाखला येणं हे
येड्यागबाळ्याचं काम नाही. त्यासाठी लागतं ते अफाट धैर्य, अविरत ध्यास, सर्वस्व
झोकून द्यायची वृत्ती आणि फायद्या तोट्याचा विचार न करता व्रतस्थतेने पर्यटकांची
सेवा करण्याची तळमळ हे सगळ त्याच्या ठायी आहेच. नुकताच कैलासची परिक्रमा करून मी
परत आलोय त्या वेळी कैलासपतीला जे साकडं घातलं ते एवढंच होतं की अशीच ताकद, धैर्य आणि
आरोग्य त्याला लाभावं. आपल्या सारख्या जीवाभावाच्या पर्यटकांकडेही आज मागत आहे ते
आत्मा आणि ईशा टुर्ससाठी असेच अनंत आशिर्वाद.
No comments:
Post a Comment