जात-पात, वर्ग, वर्णभेद, नाती-गोती आणि घराणेशाही पासून पैसा, कटकारस्थाने, गुन्हेगारी आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली हे करताना आता कोणत्याही राजकीय पक्षाला जनाची आणि मनाची लाज म्हणून राहिलेली नाही. निलाजरेपणा आणि नाटक म्हणून सध्याच्या निवडणूकांकडे पाहिलं तर मनोरंजन मात्र होईल. सरड्याला मागे टाकत आपले रंग आणि अभिनिवेश बदलण्याची कला राजकारण्यांनी दाखवायला सुरवात केली आहे. सगळ्यांचं ' एकच लक्ष सत्ता पक्ष ' असं झालय, त्यामुळे तत्वांना तिलांजली हे आलच. तेव्हा उमेदवार पाहून त्याला मतदान करावं, पक्ष पाहून नको. आपण सुध्दा पक्षाचं जोखड फेकून द्यायला शिकलं पाहीजे. निदान चांगला माणूस निवडल्याचं समाधान मिळेल.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
योग्य तेच लिहीले आहे. बस झाले हे प्रस्थापीत स्वार्थी राजकारणी
ReplyDeleteआभारी हरेकृष्णाजी
ReplyDelete