मी कळ्या ठेवल्या होत्या
झाली फुले तयांची ?
कोमेजून गेल्या का त्या ?
मी उंबर्यात अडखळलो
माघारी तेथून फिरलो
निश्वास काळ्यांचा का त्या
तुज समजाऊन घेता आला ?
मी दूर दूर जाताना
अवचीत मागे वळलो
त्या धूसर वाटांवरती
कोलाहल झाला होता
वळणांच्या पुढती वळणे
तू अनोळखी झालीस
अशी त्याच उंबर्यावरती
परतून जरी आलीस
नरेंद्र प्रभू