चित्रकार शरद तावडे |
नामांकित चित्रकार शरद तावडे यांचं ‘व्दैतअव्दैत’ हे चित्रप्रदर्शन
मुंबईत मांडण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन हिरजी जहांगीर आर्ट गॅलरी, जहांगीर आर्ट गॅलरी, एम. जी. रोड, काळा घोडा, मुंबई ४००
०२३ येथे दिनांक १० ते १६ ऑगस्ट २०१५ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या
वेळेत सर्व कला रसिकांना विनामुल्य खुलं राहील. सदर प्रदर्शनाचं उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रकार श्री.
वासुदेव कामत यांच्या हस्ते १० ऑगस्ट रोजी सायंकाळी
५ वाजता होणार आहे.
चित्रकार शरद तावडे यांची
विविध विषयांवरची अनेक समुह आणि एकल प्रदर्शनं देशाच्या विविध भागात झाली असून आताचं
‘व्दैतअव्दैत’ हे प्रदर्शन अध्यात्मिक दिशेने जाणारं आहे. कैलास मानसरोवर, ग्रामिण
महाराष्ट्र, देऊळ अशा अनेक विषयांना वाहिलेली तावडे यांची चित्रं रसिकांनी
आतापर्यंत वाखाणलेली आहेत.
मानवी मनाचा अविभाज्य भाग असलेलं व्दैत जेव्हा साधनेच्या
मार्गावर जाताना एकरूप होवून जातं तेव्हा अव्दैताची प्रत्ययकारी अनुभूती येते. अशा
समाधी अवस्थेत जो अवर्णनीय आनंद होतो त्याची झलक या चित्रांमधून आपल्याला अनुभवता
येईल. टाळाच्या नादमधूर स्वर ऎकायचा असेल तर त्यांचा एकमेकांवर हलकेच आघात व्हावा
लागतो, पिस्तूलालाही गोळ्यांशिवाय धाक दाखवता येणार नाही, सृंखलेचही तेच आणि अगदी
नेहमीच्या वापरातल्या चापालाही एकत्र आणणार्या तारेशिवाय त्याला कुणी चाप म्हणणारच नाही.
रोजच्या वापरातल्या वस्तूंची नेमकेपणाने मांडणी करून चित्रकाराने आपल्या प्रतिभेचा
साक्षात्कार घडवला आहे. आध्यात्मिक विषयाची कॅनव्हासवर उमटलेली ही चित्रं विरळीच
म्हणावी लागतील.
आपल्या या अनोख्या चित्रांबद्दल चित्रकार शरद तावडे म्हणतात:
आपल्या या अनोख्या चित्रांबद्दल चित्रकार शरद तावडे म्हणतात:
सदर प्रदर्शनाचा मुंबईकर कलारसिकांनी जरूर लाभ घ्यावा.
No comments:
Post a Comment