रंग भरल्या आकाशात
अशी रेंगाळली सांज
आता आवरता घे ना
किती करीशी तो साज
बघ खोळंबल्या कळ्या
फुले व्हावयाच्यासाठी
किती अत्तर कुप्यांची
झाली आहे इथे दाटी
झाले अधीर हे खग
परतती घरट्यात
आता फुटेलना पान्हा
गाय घावते गोठ्यात
झाली लगबग झाली
तारू आले किनार्याला
सांज कोवळी होताना
वारं आलं उधाणाला
आला मंद गंध आला
धुंद करीतो मनाला
पायरव येण्याआधी
तुझा दुत प्रकटला
नरेंद्र प्रभू
१७/०५/२०१६