30 August, 2016

CODE मंत्र



दहा दिवसांपूर्वी लेह मध्ये सीमेवर तैनात झालेल्या सैनिकांबरोबर लेह मध्ये होतो. तिथे त्यांच्या बरोबर रक्षाबंधनाचा कार्यक्रम ‘ईशा टूर्स’ ने आयोजित केला होता. दूर सीमेवर सैनिकांना भेटण्यात वेगळाचं थरार असतो, तो तिथे अनुभवला आणि आज परल्याच्या दिनानाथ मंदीरात ‘CODE मंत्र’ हे नाटक पाहिलं. संपूर्ण नाटक सीमारेषेच्या पार्श्वभूमीवर घडतं. या नाटकात चाळीसच्यावर कलाकार आहेत आणि त्या मधले बहुतेक सैनिकी वेषात आहेत. तिकडे खर्‍या सीमाभागात वावरणारे सैनिक, स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमामधलं त्यांचं संचलन आणि इथे या नाटकात सैनिकाची भूमिका वठवणारे कलाकार यांच्या देहबोलीत फरक जाणवला नाही. स्टेजवर भूमिका हुबेहुब वठवणं हे सोपं काम नव्हतं.

आता नाटका विषयी. मराठी रंगभूमीवर अशा प्रकारचं, या विषयावरचं हे कदाचीत एकमेव नाटक असेल. अतिशय संपन्न नाट्यानुभूती! पहिल्या क्षणापासून हे नाटक प्रेक्षकाच्या हृदयाचा ठाव घेतं. नाटक संपेपर्यंत दूसरा विचारही मनाला शिवत नाही. एका थराराचे आपण प्रत्यक्ष साक्षिदार आहोत असं वाटत रहातं. सगळ्यांच्याच भूमिका लाजबाब.

‘लोकसत्ता संपादक शिफारस पात्र’ असं; मुक्ता बर्वे, अजय पुरकर, संजय महाडीक यांच्या अप्रतिम भूमिका असलेलं हे नाटक मराठी नाट्य रसिकांनी आवर्जून पहावं असंच आहे. इतरत्र चालू असलेल्या मनोरंजनाच्या गदारोळात एक अस्सल कलाकृती पाहिल्याच्या आनंद दीर्घकाळ टिकून राहील असं हे पैसा वसूल आणि अखेर पर्यंत खिळवून ठेवणारं नाटक पहाच.
      



   

                          

21 August, 2016

तुझ्या मायेचा पाझर








तुझ्या मायेचा पाझर
उरे आभाळ भरून
तिन्ही त्रिकाळ वर्षांव
आले दाटून हे मन

तुझ्या मायेचा पाझर
आज आधार मनाला
जेऊ खाऊ घाली आणि
करी सावध जीवाला

तुझ्या मायेचा पाझर
रोज रोज पखरण
कधी पाखराला दाणा
कधी अवेळी रांधणं

तुझ्या मायेचा पाझर
करी रोज आवतण
दारी फुले फुलबाग
सुखी माहेरवाशीण 


नरेंद्र प्रभू

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates