दादर, मुंबई येथील वीर सावरकर स्मारकात नुकताच लाईट ऍन्ड साऊंड शो पाहिला. शिवाजी पार्कला लागून असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरच्या सावरकर स्मारकात दर शनिवार आणि रविवारी सायंकाळी आठ वाजता हा शो आयोजित करण्यात येतो. संपुर्ण भारतातील सर्वात मोठा असा हा 3D wall mapping equipment चा वापर करून दाखवण्यात येणारा शो आहे. वीस मिनिटाच्या या शो मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अमुल्य क्रातीकार्याचा आढावा घेण्यात आला आहे.
हा कार्यक्रम तरुणांपर्यत पोहोचल्यामुळे अनेक स्वातंत्र्य सैनिकांच आणि क्रातीकारकांच जीवन आजच्या पिढीला दृकश्राव्य स्वरूपात सहज पाहता येईल आणि देश प्रती असलेली प्रेमाची भावना अधिक वृद्धींगत होईल. कला आणि विज्ञान याचा संगम असलेला हा शो असून या दोन्ही क्षेत्रात पारंगत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना ही खरी श्राद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. दिग्दर्शक ओम राउउत यांनी दिग्दर्शीत केलेला हा भारतातला पहिलाच 3D शो आहे. असे शो परदेशात दाखवले जातात, परंतू भारतातला हा अशा प्रकारचा पहिलाच शो आहे.
तात्रीक दृष्ट्या उच्च दर्जाची अशी असलेली ही सकस कलाकृती करमणूकीच्या अतिरेकात झाकोळली जाता कामा नये. शिवाजीपार्कवर येणारा जनसमुदाय या तिर्थक्षेत्राकडे वळला पाहिजे. मुंबई दर्शन करणार्या अनेक सहलींचा विराम घेण्याआधी सहलीची उच्चतम पातळी गाठण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. स्वातंत्र्य सग्राम आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा ज्वलंत इतिहास इथे थोडक्या वेळात प्रभावीरित्या मांडला गेला आहे. प्रत्येक मुंबईकराने स्वत: पहावा आणि आलेल्या पाहुणे मंडळीना आवर्जून दाखवावा असा हा खेळ आहे.
No comments:
Post a Comment