हे विश्व प्रेमिकांचे अनिवार भावनांचे
जुळती सुरेल तारा झंकार तनमनाचे
डोळ्यात भाव वेडे जागेपणीच स्वप्ने
स्वप्नात
स्वप्न दिसते त्या दोन पाखरांचे
हळूवार भावनांनी इथला वसंत बहरे
मनमोर नाचताना तनगंध हाही पसरे
ते चांदणे सुखाचे न्हाऊनीया अबोली
चाहूल पावलांची गेली फिरून आली
नयनातले इशारे सांगून सर्व गेले
स्पर्शातले किनारे दुथडी भरून आले
कल्लोळ भावनांचा मग शांत शांत झाला
विश्वात प्रेमिकांचा सूर तो जुळून आला
नरेंद्र प्रभू
१४/०२/२०१८
No comments:
Post a Comment