चिमुकल्या
सान्वीने मला दिलेलं हे चित्र पुढील कविता रचून गेलं.
तू
काढलेलं
चित्र
किती
छान
आहे
त्यात
दुसर्याला
केवढा
मान
आहे
!
तुझ्या
घराशेजारीच
माझं
घर
आहे
मोठ्ठं
झाड
मात्र
माझ्याच
अंगणात
आहे
शेजारचं
तळं
तुझं
आणि
माझं
आहे
त्यात
चांदण्यांचं
रान
आहे
फुलझाडं
आणि
आकाश
केवढं
मोठं
अवकाश
आहे
त्यात
आता
आपण
रंग
भरूया
भावनांच्या
ओलाव्याने
रान
शिंपूया
बहरेल
मग
इथली
फुलबाग
पक्षी
गातील
सुरेल
राग
चिमण्याच्या
चिवचीवाटाने
किलबिलून
जाईल
इथली
वाट
तू
दिलेलं
चित्र
कित्ती
छान
आहे
तुझ्या
मनीचं ते
गान
आहे
नरेंद्र प्रभू
२९/०९/२०१८