27 August, 2022

असा खयंच नाय खावक

Audio Link असा खयंच नाय खावक 

मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

घावणे, आंबोळ्यो, खापरोळी आणि ताटाभोवती रांगोळी

नारळाचो रस, वाटाण्याचा सांबार बगून आंघोळीक मारतलस गोळी

आवशीच्या हातचा कुळताचा पिठला आणि तांदळाची भाकरी

अरे नाष्टो काय खाशीत फुडे गम्मत आसा खरी

ती विचारतली आता काजी भाजूया काय कलिंगण व्हया खावक

उताणी पडान म्हणशीत आवशी पोटात जागा नाय गे रवाक

म्हणान, मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

दुपारच्या जेवणाक गोलम्याची कोशंबीर आणि बांग़ड्याचा तिकला

भाताबरोबर भुरकूक कर्लीचा निसत्याक आणि वांग्या पण भरला

ताजो फडफडीत इसवण आजून वाट बगतलो तव्यार

अर्दाच जेवन झाला तरी येतला ता आंगार

ती म्हणात इतक्याय जमणानाय तर इलं कित्या झकमारूक

मगे तेच्यार जिरवणी म्हणान देतली सोलकडी पिऊक

मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

आरावलेलो कोम्बो कदीतरी गप जातलो

सागोती म्हणान वड्याबरोबर ताटात येतलो

दुपारी इतक्या जोवलस तरी आडवो हात मारतलस

पोटाकडे बगून आता खुप झाला म्हणतलस

आजून आये बगतली वाकान तूका वाडूक

चवच तशी म्हणत चघळत रवतलस हाडूक

मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

कितीय रवलस तरी म्हणतली फक्त दोन दिवस रव

आजून खय बगलस तू जत्रा आणि फिरान ह्या गाव

जत्रेतला खाजा आणि लाडू देतली बांदून

परड्यातली ताजी भाजी देयत कुशीक सारून

म्हणतली परत येशीत तेवा मात्र दिवस काड रवाक

ह्या पावटी इलस तरी कायच नाय खावक

म्हणान तुका सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय खावक

  नरेंद्र प्रभू    No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates