P.C. Atmaram Parab |
या सफरीवर असे विसावा
वाट
फुलांनी भरलेली
सखे सोबती मैत्र जीवांचे
अधिक
मैत्री ठरलेली
मोर पीसासम हलके होईल
मन
वेडे ते तिथेच राहील
हिरव्या वाटा निळा समुंदर
भरती
असते आलेली
किती पहा हे
सुंदर पक्षी
विहरत जाती काढीत नक्षी
रोमांचित करती रान-सावल्या
वाघ सिंह हत्तीची साक्षी
गाठू उंची
हिमालयाची
लुटूया मज्जा शुभ्र
हिमाची
मोर पीसांचे निळे
सरोवर
शिखरे पाहू ती सोन्याची
चला जाउया सोडून
बंधन
नविन जग ते येवू पाहून
क्षण सोन्याचे
आनंदाचे
भरून घेऊ तेथे जाऊन
नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment