skip to main |
skip to sidebar

परवा ‘लालबाग परळ झाली मुंबई सोन्याची’ हा चित्रपट पाहीला. मन सुन्न झालं. महेश मांजरेकरचा हा ‘शिवाजीराजे’ नंतरचा आणखी एक चांगला चित्रपट. हा चित्रपट पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. १९८३ चा जानेवारी महिना असावा. कणकवली जवळच्या तरळा या गावी डॉ. दत्ता सामंतांची एक सभा होती. दीर्घकाळ चाललेल्या गिरणी संपामुळे चाकरमान्याने कधीचीच मुंबई सोडली होती. संपकर्यांसाठी त्या सभेचं आयोजन केलेलं होतं. सरकार आपल्या एकी समोर नमत घेईल, केंद्रीय वस्त्रोंद्योग मंत्री विश्वनाथ प्रताप सिंगना लक्ष घालावं लागेल अशा प्रकारे डॉक्टर कामगारांची समजूत घालत होते. पण गिरण्या मंबईला आणि संपामुळे विस्थापीत झालेला कामगार कोकणात, त्यांच्या समोरची ती सभा म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी अवस्था होती. आमच्या गावातल्या एका कुटुंबातले पाचच्या पाच भाऊ गिरणीत कामाला होते. ते गणपतीला गावाला येत तेव्हा त्यांचा रुबाब बघण्यासारखा होता. पण त्या संपाने त्यांची रया गेली. ते कुटुंब देशोधडीला लागलं तशी लाखो कुटुंबांची हालत झाली. त्यांच्या टाळूवरचं लोणी राजकारणी आणि गिरणी मालकांनी खाल्लं. अजूनही खाताहेत. दादर येथील गोल्ड मोहर मिलला २० मार्च २०१० रोजी भीषण आग लागली होती, ती रॉकेल ओतून लावली होती. (वाचा: गोल्ड मोहर मिलला रॉकेल टाकून आग लावल्याचा अहवाल) तशा सगळ्याच आगी लावलेल्या असाव्यात. त्या आगीत गिरणी कामगारांच्या चार तरी पिढ्या खाक झाल्या. चित्रपटात ते वास्तव पहायला मिळतं.

“
हे झाड कुठचं ओ ?”
हा प्रश्न तसा साधा पण त्यातल्या मालवणी भाषेतल्या हेलाने माझं लक्ष वेधून घेतलं. या बाई थेट मालवणहून सहलीला आल्या असतील असा माझा समज झाला. पन्हाळा आणि पुढे दांडेली अभयारंण्यात फिरताना मात्र आम्ही कायमचे मित्र झाले. सारंगकाका आणि ताई त्या नंतर अनेक सहलींना भेटल्या आणि ऋणानुबंध वाढत गेले. काल त्यांनी घेतलेला D70 कॅमेरा दाखवायला आल्या. येताना कोकणातल्या फणसाचे गोड गरे आणि मालवणी खाजं आणायला विसरल्या नाहीत. मालवणी माणसाला फणसाची उपमा देतात, बाहेरून काटे आणि आतून गोड. पण या सबाह्य गोड स्वभावाच्या. महापालिकेच्या शाळेतून शिक्षीका म्हणून निवृत्त झाल्या पण घरात बसून राहील्या नाहीत. झाडं फुलं यांची खुप आवड, फिरण्याची आवड, जंगलातून फिरताना एखादा प्राणी दिसला की एवढ्या खुश होतील की सांगता सोय नाही. एकदा असाच ताडोबात वाघ दिसला तर या लहानमुलासारख्या उत्साहाने ओरडल्या “
काय नाय वाघ...!, दिसता बघा कसो...! बाबा माज्या केदो मोठे......, जंगलचो राजोच तो...!”
त्यांच्यातलं लहान मुल अजून जागं आहे. वयाच्या सदुसष्टव्या वर्षी मधूमेह, स्लिपडीस्कचा त्रास असूनही “
शिरापडो तेच्यार”
म्हणत, त्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत, आपण आनंदी राहत आणि इतरांना आनंद देत त्या त्यांच्या ‘
बालसुलभ’
स्वभावाप्रमाणे अनेक क्षेत्रात अजून खुप शिकायचं आहे म्हणून रस घेतात आणि प्रश्न विचारतात. आता फोतोग्राफी शिकायची आहे म्हणून म्हणत होत्या. हे असं जगलं पाहीजे. सारंगताईंकडून जगण्याची कला शिकली पाहीजे.
आत्ताच्या काळात व्यक्तीस्वातंत्र्याचा एवढा अतिरेक होताना दिसतो की घरातही लहान मुलांना बोलायची सोय उरलेली नाही. पालकांनी जरा कुठे रागवलं की काही बाबतीत असं होतं की मुलं सरळ आत्महत्या करतात. हे असं का घडतं? चांगले संस्कार व्हायला पाहिजेत तर ‘
छडी लागे छम् छम्’
चा जमाना गेला तरी मुलांनी स्वैर वागू नये म्हणून त्यांना काहीवेळा समज देणं आवश्यक असतच. जुने जाऊद्या म्हटलं तरी त्या जुन्या अनुभवांवरच आपलं पुढचं पाऊल पडत असतं. कुमारवयात पालकांनी केलेली कानऊघाडणी किंवा पालकांच्या वागणूकीचा मुलांना तेव्हा राग येत असला तरी पुढे आयुष्यात कधीतरी ते वागणं बरोबर होत हे ध्यानात येतं. हरिवंशराय बच्चन हे लेखक कवी म्हाणून आपणा सर्वांना माहित आहेतच पण ते कशाप्रकारचे पालक होते हे अमिताभ बच्चन शिवाय कोण चांगलं सांगू शकेल. हरिवंशराय बच्चन पाकल म्हणून तेव्हा तसे वागले म्हणूनच आजचा ‘बिग बी’ पहायला मिळाला असं खुद्द अमिताबच म्हणतो. नुकताच लोकसत्तामध्ये एक लेख वाचनात आला. जरूर वाचा शिला..ध्यास!