महाराष्ट्र शासनाला मंत्रालयात बसून निर्णय घेणं आवडेनासं झालेलं आहे त्यामुळे कधी ओरोस तर कधी नाशिकला मंत्रिमंडळाचं वर्हाड जमा होऊ लागलयं. महाराष्ट्रातील आत्मघाताच्या उंबरठ्यावरचा शेतकरी यांनी कधीच नजरेआड केलाय ( डॉ. नरेंद्र जाधवांनीच तसा परवाना दिलाय ) आता दिसते आहे ती केवळ युरोप आणि अमेरीका. म्हणूनच कोकणात मादाम तुस्साँच्या धर्तीवर मेणाच्या पुतळ्यांचे प्रदर्शन ( मायावतीचा आदर्श घेऊन स्वतःचेच पुतळे तिथे ठेवा ) तर उत्तर महाराष्ट्राच्या पॅकेजमध्ये आजपर्यंत विदेशी समजल्या जाणार्या वाईनला व्हॅटमध्ये तब्बल १६ टक्के रिबेट. (बघा आता महाराष्ट्राचा कसा कायापालट होतो तो.) वाईनवर २५ टक्के असलेला व्हॅट २० टक्के करण्यात आला आणि त्यात १६ % रिबेट देण्याचा निर्णय घेतला गेला. बघा बाईनवरचा व्हॅट ४ % करण्यासाठी किती कोलांट्या उड्या मारल्या ते. हे सगळे कसरतपटू पद्मसिंहाचेच चेले. कोण आत कोण बाहेर एबढच. सगळ्या नितीमत्तेचा दिवसा ढवळ्या खुन होतोय.
पुर्वी शिकवलं जायचं समाधानी वृत्ती ठेवा, ' दाल रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ ' आता डाळ परवडत नाही ना ? मग वाईन प्या , तिच्यावरचा कर कमी केलाय एकूण काय तर ' पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार... '
मेलेल्या व्यक्तिबद्दल वाईट बोलू नये पण ऐतिहासिक परिस्थितीचे वर्णन करायला रूढीपरंपरेमध्ये परवानगी असावी असे मानून...
ReplyDeleteते अलिकडचेच पूर्वीचे शिक्षणमंत्री, इंग्रजी शिक्षण महाराष्ट्रभर सक्तीची केली आणि स्वतः आत्महत्या करून मोकळे झाले त्यातलाच प्रकार वाटतोय... काहितरी...