गेली ४२ वर्ष जे कुठल्याही सरकारने केलं नाही आणि लोकपाल बिल योग्यरित्या आणण्याचा ह्या सरकारचाही मानस नव्हता ते बिल आता येऊ घातलय. तमाम राजकारण्यांनी ज्या अण्णांना हिणवण्यातच धन्यता मानली त्या सर्वांचा मुखभंग झाला आहे. अनिच्छेने का होईना सर्वच्या सर्व राजकारण्यांना लोकसभेत अण्णांसमोर नतमस्तक व्हावं लागलं. अण्णानी उपोषण सोडलं पण ते सोडताना हा अर्धा विजय आहे असं सांगायला ते विसरले नाहीत. अजून लढाई बाकी आहे. भ्रष्ट राजकारण्यांना निवडून देऊ नका असं आवाहन करण्यासाठी ते देशव्यापी दौरा करणार आहेत. गेले बारा-तेरा दिवस संपुर्ण देशातून जो प्रतिसाद अण्णाना मिळाला तो पाहाता नव्या बदलाची सुरुवात होत आहे.... लोकशाहीचे वाली म्हणवणारे वाली-सुग्रीवासारखे भांडत आहेत, ते दूर होतील आणि २०१४ साली कदाचीत नवी पहाट होईल. आत्तातर सुरुवात झाली आहे. समाजालाच जर भ्रष्टाचार नको असेल तर तो नाहीसा व्हायला किती वेळ लागणार? एक ठिणगी पडली आहे... त्याचा वणवा नक्कीच होईल .
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
1 week ago