वन पाचूचे, बन पाचूचे
हिरवी झाली धरती
दुथडी भरून वाहे गंगा
आकाशाला भरती
गहिवरले ढग, मोहरले जग
आनंदा ना गणती
दाही दिशांचे पालटले रुप
चहूबाजू या सजती
इंद्रधनूचा खेळ साजरा
कितीक रंगांचा नजारा
नाद खळाळत वाहतो झरा
धबधब्यांच्या धवल धारा
दरी दरीतून गार वारा
लयीत नाचे पिक शिवारा
क्षणात होतो वरून मारा
सुखवून जाई गाय-वासरा
रानफुलांची मखमल सजली
फुलपाखरे नाचू लागली
पक्षीगणांची किलबिल झाली
हर्षभराने धरा नाहली
मंदिरातला नाद सुमधूर
भरून राहे ललनांचा स्वर
मंजूळ पावा वाजे दूरवर
जुळून आले सारे हे सुर
मनमोहन हा साजरा श्रावण
तजेल्यात ह्या नाचे तनमन
पाचूचे वन, पाचूचे बन
आनंदाची झाली पखरण
वाह, दिल खुश कर दिया आपने काकाजी :)
ReplyDeleteबादवे नवा लुक मस्तच आहे , आवडेश :)