रिमझिमत्या अंबरात
आता
पाऊसवेळा आल्या ग ।
कृष्णपिसारा फुलवीत
सार्या
घन घनमाला झाल्या ग
।
क्षणात गेले उष्ण
उसासे,
तप्त धरेवर धारा ग ।
कुणी फिरवला रंगमंच
हा,
कुठून आला वारा ग ।
न्हावून गेले घर,
धरणी, तरू,
धावून आल्या धारा ग
।
नाचत आले तुषार ओले
कुणी छेडल्या तारा ग ।
कातर झाले मन अवघे अन
कातरवेळा झाल्या ग ।
कितीक पाऊस असे झेलले,
हळव्या झाल्या राना ग ।
असाच तुफान करतो पाऊस,
मनात माझ्या सारा ग ।
रिमझिमत्या अंबरात
आता
पाऊसवेळा आल्या ग ।
नरेंद्र प्रभू
०७/०६/२०१५
No comments:
Post a Comment